शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
2
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
3
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
4
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
5
किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
6
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
7
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
8
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
9
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
10
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
11
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
12
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
13
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
14
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
15
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
16
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
17
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
18
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
19
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
20
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: तिलारीत अज्ञाताने कार पेटवली, दोडामार्गचे नगराध्यक्ष ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 13:41 IST

गाडीतून मांस तस्करी होत असल्याच्या कारणावरून ही आग लावल्याची चर्चा

दोडामार्ग (जि. सिंधुदुर्ग) : तिलारी येथे मांस वाहतूक करणाऱ्या एका गाडीला आग लागल्याची घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली. या गाडीतून मांस तस्करी होत असल्याच्या कारणावरून ही आग लावल्याची चर्चा होती. या प्रकरणी पोलिसांनी नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.घटनेचे गांभीर्य लक्षात घेता कोकण परिक्षेत्र महानिरीक्षक संजय दराडे यांनी तत्काळ येथील पोलिस ठाण्याला भेट देत घटनेची माहिती घेतली. दोडामार्ग शहरासह संपूर्ण तालुक्याला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले. रात्री उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.तिलारी घाट माथ्यावरून एक स्विफ्ट कार गुरुवारी दुपारी दोडामार्ग मार्गे गोव्याला जात होती. तिलारी येथे ही कार आली असता काही अज्ञातांनी त्यात मांस असल्याचा संशय व्यक्त करत ती कार थांबवली. आतमध्ये मांस दिसताच ती कार जाळली. कारमधून आगीचे मोठे लोळ बाहेर पडत होते.घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक हेमचंद्र खोपडे हे आपल्या टीमसह घटनास्थळी दाखल झाले. काही वेळातच अप्पर पोलिस अधीक्षक नयोमी साटम यादेखील घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी तत्काळ राज्य मार्ग दोन्ही बाजूने बंद केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Sindhudurg: Car set ablaze in Tilari, Dodamarg Mayor detained.

Web Summary : A car carrying meat was torched in Tilari, Sindhudurg, leading to the detention of Dodamarg Mayor Chetan Chavan for questioning. Suspicion of meat smuggling fueled the incident. Police are investigating; the area is under heightened security.