शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आडाळी एमआयडीसी जागेतील ५० एकरचा भूखंड जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 11:06 IST

environment Sindhudurg Neews: केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या राष्ट्रीय वनौषधी संस्था स्थापन करण्यासाठी आडाळी एमआयडीसी जागेतील ५० एकरचा भूखंड जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात दिला. जागेचे सीमांकनही करण्यात आले. शुक्रवारी महामंडळ व दोडामार्ग तहसीलदार यांच्यात तसा करार झाला आहे. अलिकडेच राज्य मंत्रिमंडळाने या प्रकल्पासाठी ५० एकर जागा मोफत व १०० कोटीचा निधी देण्याचा निर्णय घेतला होता.

ठळक मुद्देआडाळी एमआयडीसी जागेतील ५० एकरचा भूखंड जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात १०० कोटींचा निधी देण्याचा निर्णय : आशा पल्लवीत

दोडामार्ग : केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या राष्ट्रीय वनौषधी संस्था स्थापन करण्यासाठी आडाळी एमआयडीसी जागेतील ५० एकरचा भूखंड जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात दिला. जागेचे सीमांकनही करण्यात आले. महामंडळ व दोडामार्ग तहसीलदार यांच्यात तसा करार झाला आहे. अलिकडेच राज्य मंत्रिमंडळाने या प्रकल्पासाठी ५० एकर जागा मोफत व १०० कोटीचा निधी देण्याचा निर्णय घेतला होता.आडाळीत औद्योगिक क्षेत्र मंजूर होऊन तब्बल आठ वर्षाच्या कालांतराने येथील पहिला भूखंड महामंडळाने प्रकल्पासाठी दिल्याने आशा पल्लवीत झाल्या आहेत. गेल्या तीन वर्षांपासून राष्ट्रीय वनौषधी संशोधन संस्था आडाळी येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जागेत मंजूर करण्यासाठी प्रयत्न सुरु होते. केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी आडाळी येथे प्रकल्पाला मंजुरी दिली होती. मात्र, हा प्रकल्प जळगाव येथे नेण्यात आला. राज्यात युतीची

सत्ता जाऊन महाआघाडी ची सत्ता आली. त्यानंतर नाईक यांनी पुन्हा आडाळीत प्रकल्प मंजुरीची घोषणा केली. प्रकल्पासाठी राज्य शासनाकडून मोफत जमीन मिळणे आवश्यक होते. अखेर आडाळी एमआयडीसी मधील 50 एकर जागा प्रकल्पसाठी देण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळने घेतला. त्यानंतर तत्काळ महामंडळाकडून जागा निश्चित करण्यात आली आहे. तसेच जागेचे सीमांकनही करण्यात आले आहे.महामंडळाने ही जागा राज्यशासनाकडे हसतांतरित केली. शुक्रवारी दोडामार्ग तहसीलदार अरुण खानोलकर व महामंडळाचे अधिकारी उमेश कोष्टी यांनी आडाळी येथे हस्तानंतरण करारावर सह्या केल्या. यावेळी मंडळ अधिकारी प्रेमानंद सावंत, तलाठी श्रीमती गोरे उपस्थित होते. यावेळी कोष्टी यांनी तहसीलदार यांना प्रकल्पसाठी निश्चित केलेली जागा दाखवली.आशादायक सुरवातकेंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त सहकार्यातून हा प्रकल्प उभा राहणार आहे. अनेक अडथळे पार करून प्रकल्प आता दृष्टक्षेपात येत आहे. केंद्र आणि राज्यात वेगळ्या पक्षांची सरकारे आणि त्यात पुन्हा कोकणातील प्रकल्प अशी स्थिती असल्याने प्रकल्प मार्गी लागण्याची शक्यता नाही असे भाकीत वर्तविले जात होते. पण सत्ताधारी आणि विरोधकांची समन्वयाची भूमिकाच या प्रकल्पाचा मजबूत पाया ठरली आहे. शिवाय आडाळीसाठीही ही ऐतिहासिक बाब आहे. गेली आठ वर्षे जी मेहनत आम्ही एमआयडीसी साठी घेत आहोत, ती आता फळाला येत असल्याचे स्थानिय लोकांधिकार संरक्षण समितीचे समन्वयक पराग गावकर यांनी सांगितले. 

टॅग्स :environmentपर्यावरणAyurvedic Home Remediesघरगुती उपायsindhudurgसिंधुदुर्ग