रेशन दुकानांमध्ये निकृष्ट धान्याचे वितरण, शिरोडा येथील प्रकार उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 18:15 IST2021-05-10T18:12:42+5:302021-05-10T18:15:54+5:30
Vengurla Sindhudurg : शिरोडा येथे सध्या रेशन दुकानांमध्ये लाभार्थी कुटुंबांना मोफत मिळत असलेली डाळ ही अत्यंत निकृष्ट दर्जाची वाटप केली जात आहे. गोरगरीब कुटुंबाच्या आरोग्याचा विचार करून खाण्यायोग्य धान्याचा पुरवठा व्हावा, अशी मागणी शिरोडा सरपंच मनोज उगवेकर यांनी केली आहे.

रेशन दुकानांमध्ये निकृष्ट धान्याचे वितरण, शिरोडा येथील प्रकार उघड
वेंगुर्ला : शिरोडा येथे सध्या रेशन दुकानांमध्ये लाभार्थी कुटुंबांना मोफत मिळत असलेली डाळ ही अत्यंत निकृष्ट दर्जाची वाटप केली जात आहे. गोरगरीब कुटुंबाच्या आरोग्याचा विचार करून खाण्यायोग्य धान्याचा पुरवठा व्हावा, अशी मागणी शिरोडा सरपंच मनोज उगवेकर यांनी केली आहे.
शिरोडा धान्य दुकानांमध्ये वितरित करण्यात येत असलेली डाळ खराब आहे. अशा तक्रारी आल्याने सरपंच उगवेकर यांनी रेशन दुकानांना भेट दिली असता वितरित होणारी डाळ खराब असल्याचे दिसून आले. पाळीव प्राण्यांना खायला देताना ही अंगावर काटा येईल, अशा दर्जाची ही डाळ सध्या रेशन दुकानवर गरीब लाभार्थ्यांना मोफत म्हणून वाटप केली जात आहे.
शनिवारी दुपारीच शिरोडा धान्य दुकानाची पाहणी करून पुरवठा विभागाला याविषयी विचारले असता, त्यांच्याकडून सर्व गावांत असेच धान्य आले असल्याचे समजले. मोफत धान्याच्या नावाखाली गरजू गरिबांची क्रूर चेष्टा राज्य शासनाकडून चालू आहे. असे धान्य शासनाने नागरिकांना देऊ नये. याबाबत आम्ही नाराजी व्यक्त करतो, असे उगवेकर यांनी सांगितले.