शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद जलव्यवस्थापन सभेत पाणी प्रश्नावर चर्चा रंगली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 15:35 IST

जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आलेल्या पाणीटंचाईच्या २०८ अंदाजपत्रकांपैकी एकाही कामाला मंजुरी देण्यात आली नसल्याने सभागृहात पुन्हा एकदा संताप व्यक्त करण्यात आला. ग्रामीण भागातील वाड्या तहानलेल्या असतानाही टंचाईच्या कामांना मंजुरी न देणे हे योग्य नसल्याचे उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी सांगत टॅकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली. तर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याबाबत आपण जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून निर्णय घेऊ असे सांगितले.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्हा परिषद जलव्यवस्थापन सभेत पाणी प्रश्नावर चर्चा रंगलीपाणीटंचाईच्या कामांना अद्याप मंजुरी नाही; टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी

सिंधुदुर्गनगरी : जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आलेल्या पाणीटंचाईच्या २०८ अंदाजपत्रकांपैकी एकाही कामाला मंजुरी देण्यात आली नसल्याने सभागृहात पुन्हा एकदा संताप व्यक्त करण्यात आला. ग्रामीण भागातील वाड्या तहानलेल्या असतानाही टंचाईच्या कामांना मंजुरी न देणे हे योग्य नसल्याचे उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी सांगत टॅकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली. तर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याबाबत आपण जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून निर्णय घेऊ असे सांगितले.जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची मासिक सभा जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांच्या अध्यक्षतेखाली येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडली. यावेळी समिती सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी, उपाध्यक्ष रणजित देसाई, विषय समिती सभापती पल्लवी राऊळ, अंकुश जाधव, सदस्य सरोज परब, श्वेता कोरगांवकर, विकास कुडाळकर, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.चार कोटी पेक्षा जास्त रूपयांच्या पाणीटंचाई आराखड्यास शासनाने मान्यता देऊनही सद्यस्थितीत ग्रामीण भागात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याचे भयानक चित्र पहावयास मिळत आहे. जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने २०८ कामांची अंदाजपत्रक सादर करण्यात आली होती. मात्र मे महिना सुरू झाला तरी यातील एकाही कामाला जिल्हाधिकारी यांनी प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली नाही. अशी माहिती सभागृहात उघड झाली.

सध्या आचारसंहिता लागू असल्याने टंचाईच्या कामांना प्रशासकीय मान्यता देता येत नाही असे सांगण्यात आले. तर आचारसंहितेपूर्वी कामांची ६० अंदाजपत्रक सादर करण्यात आली असल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीपाद पाताडे यांनी सांगितले.

आचार संहितेचे कारण पुढे करणाऱ्या जिल्हाधिकारी यांनी आचारसंहितेपूर्वी पाठविलेल्या कामांच्या अंदाजपत्रकांना मान्यता देणे आवश्यक होते. मात्र तसे झाले नाही, असे सांगून अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह सर्व सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे तहानलेल्या वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा सुरू करावा असे उपाध्यक्ष देसाई यांनी सांगितले. तर आपण यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याशी बोलून निर्णय घेऊ असे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले .राष्ट्रीय पेयजल योजनेतून २८ पैकी २३ योजना पूर्ण झाल्या आहेत. या कामांवर ११ कोटी १० लाख रुपये निधी खर्च झाला आहे. यांत्रिकीकरण विभागाच्यावतीने २७ हातपंप दुरूस्त करण्यात आले आहेत. तर मागासवर्गीय जनतेचा पाणीटंचाई आराखडा तत्काळ सादर करा, अशी सूचना सभापती अंकुश जाधव यांनी केली.मंजुलक्ष्मी यांची सकारात्मक भूमिकासमिती सदस्य सरोज परब यांनी आपल्या मसुरे मतदारसंघातील पाणीटंचाई संदर्भातील तीन प्रश्न उपस्थित केले. यात रेवंडी बंधारा, रमाई नदीवरील बंधाऱ्याची काम अपुरी असल्याने सदस्य परब यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. दोन दोन वर्षे प्रश्न उपस्थित करूनही जर न्याय मिळत नसेल तर मतदार संघातील प्रश्न उपस्थित करून काय उपयोग? असा सवालही परब यांनी उपस्थित केला. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी सकारात्मक भूमिका घेत हे सर्व प्रश्न आपण सोडुया असे आश्वासन दिले.

टॅग्स :zpजिल्हा परिषदsindhudurgसिंधुदुर्ग