शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

विजेचा प्रश्न, मात्र स्थानिक भाजपमधील मतभेद उघड; संजू परब यांनी कान टोचले

By अनंत खं.जाधव | Updated: May 31, 2024 14:56 IST

सावंतवाडी : सावंतवाडी येथे विजेच्या प्रश्नावरून आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत प्रिपेड वीज मिटर वरून अ‍ॅड. संदिप निंबाळकर यांनी भाजप ...

सावंतवाडी: सावंतवाडी येथे विजेच्या प्रश्नावरून आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत प्रिपेड वीज मिटर वरून अ‍ॅड. संदिप निंबाळकर यांनी भाजप नेत्यांच्या समोरच सरकार विरोधी मत मांडल्यानंतर आता भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संजू परब यांनी बैठकीला गेलेल्या भाजप नेत्याचे कान टोचले आहेत.भाजप सत्तेत असतना सर्वपक्षीय बैठकीत तुम्ही गेलात कशाला पालकमंत्री रविंद्र चव्हाण व शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून प्रश्न सोडविण्यात येणार असल्याचे परब यांनी स्पष्ट केले.ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी तालुका मंडल अध्यक्ष महेश धुरी उपस्थित होते.सावंतवाडीत गुरूवारी विज समस्या सोडविण्याबाबत सर्वपक्षीय बैठक पार पडली या बैठकीत प्रिपेड विज मिटर वरून अ‍ॅड. निंबाळकर यांनी विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद पाटील यांना प्रिपेड वीज मिटर सिंधुदुर्ग जिल्ह्यात बसवू देणार नाही असा पवित्रा घेत थेट सरकार वरच हल्ला चढवला यावेळी तेथे उपस्थित असलेले माजी आमदार राजन तेली विशाल परब अजय गोंदावळे यांच्यासह भाजप पदाधिकारी शांत होते.त्यावरून जिल्हा उपाध्यक्ष संजू परब मात्र चांगलेच आक्रमक झाले असल्याचे दिसून आले.भाजप पक्ष सक्षम असून अशा सर्व पक्षीय आंदोलने करण्यापेक्षा भाजप नेत्यांनी स्वतंत्र पणे हा प्रश्न हाताळला पाहिजे ज्यांनी लोकसभा निवडणुकीत आमचे नेते नारायण राणे यांच्यावर टिका केली त्याच्या सोबत आमचे पदाधिकारी जाऊन बसतात अशा शब्दांत परब यांनी नाराजीचा सूर आळावला तसेच मी माझ्या भूमिकेवर ठाम असल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले.तसेच बबन साळगावकर यांनी सावंतवाडी शहरासाठी आलेले ११ कोटी रूपये परत घालवले ते आज विजेच्या प्रश्नासाठी एकत्र येतात ही मोठी शोकांतिका असून विजेच्या प्रश्नात आम्ही जनतेसोबत आहोत पण पालकमंत्र्यासह आमच्या सत्ताधाऱ्यांवर टिका करत असलेल्यांना सोबत घेणाऱ्यांना माफ करणार नसल्याचे ही परब म्हणाले.

सावंतवाडीचे प्रश्न स्थानिक सोडवतीलसावंतवाडीचे प्रश्न स्थानिक सोडवतील त्यासाठी बाहेरील व्यक्तीनी सावंतवाडी मतदारसंघात येऊन लुडबुड करण्याची गरज नाही असे ही परब यावेळी म्हणाले

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSawantwadiसावंतवाडीelectricityवीजBJPभाजपा