शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत आतापर्यंत ८.१ टक्के मतदान;पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान हातबॉम्ब फेकले; अनेक जखमी
2
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
3
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
4
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
5
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
6
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
7
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
8
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
9
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
10
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
11
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
12
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
13
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
14
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
15
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
16
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
17
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
18
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
19
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
20
बाल्कनीतून कबुतरांना हटवण्याचा सर्वात सोपा अन् प्रभावी उपाय; समस्येतून मिळेल कायमचा तोडगा
Daily Top 2Weekly Top 5

देवगड पंचायत समितीचे कार्य कौतुकास्पद

By admin | Updated: August 4, 2015 00:09 IST

शेखर सिंह : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी साधला कर्मचाऱ्यांशी संवाद

देवगड : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मी सर्वप्रथम भेट दिलेली पहिली पंचायत समिती देवगड ही आहे. देवगड पंचायत समितीने विविध योजना, अभियाने राबविण्यात जिल्ह्यात, कोकण विभागात किंबहुना राज्यात अव्वल स्थानावर राहण्याची सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंग यांनी केले.राज्याच्या ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव व्ही. गिरिराज यांच्या कुणकेश्वर दौऱ्यानिमित्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंग कुणकेश्वर येथे आले होते. यावेळी त्यांनी देवगड पंचायत समितीला भेट देऊन अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते. यावेळी गटविकास अधिकारी विजय चव्हाण, सहायक गटविकास अधिकारी शारदा नाडेकर, उपअभियंता मोहिते, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी घोगरे, तालुका आरोग्य अधिकारी कोंडके, गटशिक्षणाधिकारी निसार नदाफ, विस्तार अधिकारी आर. एस. शिंदे, आदी अधिकारी, कर्मचारी व ग्रामसेवक उपस्थित होते.गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी पुष्पगुच्छ देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंग यांचे स्वागत केले. तसेच ग्रामसेवक संघटनेच्यावतीने तालुका अध्यक्ष आर. एल. साटम व उपसचिव मंगेश साळसकर यांनीही त्यांचे स्वागत केले. देवगड पंचायत समितीच्या यशाची उज्ज्वल परंपरा आम्ही कायम राखू, अशी ग्वाही गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त करताना दिली. (प्रतिनिधी)यशाची परंपरा कायम राखादेवगड पंचायत समिती यशवंत पंचायत राज अभियानात राज्यात सलग तीन वेळा प्रथम आली आहे. पर्यावरण विकासरत्न पुरस्कार मिळवणारी ती राज्यातील एकमेव पंचायत समिती ठरली होती. राज्यातील पहिली आय.एस.ओ. मानांकनप्राप्त, १०० टक्के कुपोषणमुक्त अभियान राबविणारी, लोकराज्य ग्राम राबविणारी त्याचप्रमाणे रोजगार हमी योजनेतदेखील कोकण विभागात सर्वोत्कृष्ट काम करत गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली विविध योजना नुसत्याच राबविल्या नाहीत, तर यशस्वी करून दाखविल्या आहेत. यशाची हीच परंपरा व सातत्य आपण सर्वांनी कायम राखा, असे आवाहन केले.