शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
5
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
7
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
8
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
9
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
10
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
11
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
12
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
13
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
14
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
15
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
16
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
17
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
18
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
19
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
20
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
Daily Top 2Weekly Top 5

देवस्थानांचा विकास करणार

By admin | Updated: August 3, 2015 21:28 IST

दीपक केसरकर : जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे बक्षीस वितरण

सावंतवाडी : मंत्रिपदाच्या माध्यमातून राज्यातील देवस्थानांचा पर्यटनदृष्ट्या विकास करणार आहे, असे आश्वासन वित्त व ग्रामविकास राज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले. येथील विठ्ठल मंदिरात हरिनाम वीणा सप्ताहानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय भजन स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नगरसेविका कीर्ती बोंद्रे, शर्वरी धारगळकर, अर्बन बँकेचे चेअरमन गोविंद वाडकर, शशिकांत नेवगी, अ‍ॅड. दीपक नेवगी, बाळा बोर्डेकर, आबा केसरकर, गिरीधर परांजपे, मंगेश तळवणेकर, नंदकिशोर शिरोडकर, आदी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री केसरकर यांच्या हस्ते भजन स्पर्धेतील विजेत्या संघांना बक्षीस वितरण झाले. भजन स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतलेल्या आबा केसरकर, शशिकांत नेवगी, मंगेश तळवणेकर, नंदकिशोर शिरोडकर, आदींचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. (वार्ताहर)विजेत्यांना गौरविलेप्रथम क्रमांक विजेते गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल-वेंगुर्ले) यांना ७ हजार ७७७ रुपये व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांक विजेते सातेरी दशावतारी प्रासादिक भजन मंडळ यांना ५ हजार ५५५ रुपये व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांक विजेते सावंतवाडी येथील सद्गुरू प्रासादिक भजन मंडळाला ३ हजार ३३३ रुपये व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच उत्कृष्ट गायक अजित पंडित (माऊली प्रासादिक भजन मंडळ, कास), उत्कृष्ट हार्मोनियम-अनिल पांचाळ (रामेश्वर प्रासादिक भजन मंडळ, कुडाळ), उत्कृष्ट पखवाज-समीर गोडकर (राष्ट्रोळी प्रासादिक भजन मंडळ, भोगवे), उत्कृष्ट शिस्तबद्ध संघ सद्गुरू प्रासादिक भजन मंडळ, म्हापण-मालवण, उत्तेजनार्थ महापुरुष प्रासादिक भजन मंडळ, त्रिंबक -गाडवाडी (मालवण), उत्तेजनार्थ गायक संतोष धर्णे (स्वामी समर्थ भजन मंडळ, कलंबिस्त), उत्कृष्ट कोरस-मळगाव सावळवाडा भजन मंडळ यांना गौरविण्यात आले.