शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य उपसंचालकाना नितेश राणेंनी धरले धारेवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 13:16 IST

nitesh rane sindidurg- कणकवली तालुक्यातील शिक्षक व नागरिकांचे कोरोना तपासणीसाठी स्वॅब घेण्यात आले होते. ते स्वँब चाचणीसाठी ओरोसला नेण्यासाठीच्या वाहनात डिझेल नसल्यामुळे दोन दिवस अहवाल आले नाहीत. शासनाकडून डिझेलसाठी व अन्य खर्चासाठी निधी मिळत नसल्याचे कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरानी सांगितले. त्यामुळे आमदार नितेश राणे संतप्त झाले. त्यांनी आरोग्य उपसंचालक बोरसे यांना दूरध्वनीद्वारे संपर्क करत या मुद्यावरून धारेवर धरले.

ठळक मुद्देकोरोना स्वॅब टेस्टिंगला नेण्यासाठी वाहनात डिझेल नसल्याची बाब उघड ठाकरे सरकार जबाबदार असल्याचा नितेश राणे यांचा आरोप

कणकवली : कणकवली तालुक्यातील शिक्षक व नागरिकांचे कोरोना तपासणीसाठी स्वॅब घेण्यात आले होते. ते स्वँब चाचणीसाठी ओरोसला नेण्यासाठीच्या वाहनात डिझेल नसल्यामुळे दोन दिवस अहवाल आले नाहीत. शासनाकडून डिझेलसाठी व अन्य खर्चासाठी निधी मिळत नसल्याचे कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरानी सांगितले. त्यामुळे आमदार नितेश राणे संतप्त झाले. त्यांनी आरोग्य उपसंचालक बोरसे यांना दूरध्वनीद्वारे संपर्क करत या मुद्यावरून धारेवर धरले.तसेच जोपर्यंत शासनाचा निधी येत नाही तोपर्यंत माझ्या स्वतःच्या खर्चाने डिझेल व रुग्णवाहिकेची व्यवस्था करत असल्याचे आश्वासन आमदार राणे यांनी यावेळी दिले. या निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीला राज्यातील निष्क्रिय ठाकरे सरकार जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

कणकवली उपजिल्हा रुग्णालयाला आमदार नितेश राणे यांनी शनिवारी सकाळी १० . २५ वाजण्याच्या सुमारास भेट दिली. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, नगरसेविका मेघा गांगण, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री,गणेश तळगावकर, राकेश परब आदीसह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी कोरोना तपासणीसाठी घेण्यात आलेले स्वॅब हे दोन दिवस कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आहेत. त्याला जबाबदार कोण ? अशी विचारणा कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. सतीश टाक यांना आमदार नितेश राणे यांनी केली.अनेक शिक्षकांनी शाळा सुरु होत असल्यामुळे आपले स्वॅब चाचणीसाठी दिले होते.त्यांचेही अहवाल आलेले नाहीत मग शासन नेमके करते काय ? जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी २३ कोटीचा निधी कोरोनासाठी आल्याचे सांगत आतापर्यंत ९ कोटी खर्च झाला असेही सांगितले. मग हा निधी खर्च कुठे होतोय ? या सगळ्या परिस्थितीला जिल्ह्यातील पालकमंत्री , खासदार आणि प्रशासन जबाबदार आहे.लोकांच्या जीवाशी खेळण्याचे काम जिल्ह्यातील सत्ताधारी आणि ठाकरे सरकार करत आहे. ही गंभीर बाब आहे, या विरोधात आपण निश्चितच आवाज उठवणार आहोत . कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील प्रश्‍नांसंदर्भात जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांच्याकडे वेळ मागून संयुक्त बैठक घेऊन त्यात हे प्रश्न मार्गी लावले जातील असेही नितेश राणे यांनी यावेळी सांगितले.

कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील डॉ.शिकलगार व डॉ. टाक यांनी विविध समस्या यावेळी आमदार नितेश राणे यांच्यासमोर मांडल्या. काही खर्च बऱ्याच वर्षापासून शासनाकडून मिळालेले नाही. त्यामुळे रुग्ण सेवेवर परिणाम होत आहे. तसेच ३१ जानेवारीला स्वँब टेस्टिंग सेंटरमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचार्‍यांची मुदत संपत असल्याच्या बाबीकडे आमदार नितेश राणे यांचे लक्ष वेधण्यातआले. त्याबाबत आपण प्रशासनाला कार्यवाही करायला लावतो असेही आमदार राणे यावेळी म्हणाले.

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे sindhudurgसिंधुदुर्ग