शहरं
Join us  
Trending Stories
1
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
2
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
3
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
4
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
5
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा उद्या निकाल, रिझल्ट कुठे व कसा पाहायचा? A टू Z माहिती
6
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
7
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
8
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
9
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
10
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
11
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
12
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
13
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
14
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
15
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
16
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
17
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
18
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
19
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
20
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

By admin | Updated: November 18, 2014 23:35 IST

भाजपाची आक्रमक भूमिका : डॉक्टरवर हल्ला करणाऱ्यास व्हीआयपी वागणूक

ओरोस : जिल्हा रूग्णालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ. विजय ढवळे यांच्यावर हल्ला करणाऱ्या संशयिताला व्हीआयपी वागणूक दिली होती. या पार्श्वभूमीवर भाजपच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक संजयकुमार बाविस्कर यांची भेट घेतली. या प्रकरणातील अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी यावेळी भाजपने केली.जिल्हा रूग्णालयात प्रामाणिक काम करणारे डॉ. ढवळे यांच्यावर आजपर्यंत अनेक राजकीय आणि संशयित लोकांनी हल्ले केले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात बाहेरून येणारे डॉक्टर हे आपल्याकडे येऊन काम करण्यास तयार होत नाहीत.राजकीय हस्तक्षेप होत असल्यामुळे पोलीस संशयितांना अटक करू शकत नसल्यामुळे पोलिसांवरील जनतेचा विश्वास उडाला असल्याबद्दल बोलले जात आहे. त्यामुळे आज जिल्हा पोलीस अधीक्षक संजयकुमार बाविस्कर यांची भाजपच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी व गुरूवारपर्यंत चौकशीचे आदेश देण्याचे बाविस्कर यांना शिष्टमंडळाने सांगितले.जिल्हा रूग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. आर. डी. माने यांची भाजपच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन डॉ. ढवळे व त्यांच्या वडीलांची विचारपूस केली. डॉ. ढवळे यांना मारहाण झाल्यानंतर असंख्य फोन आले, पण त्यावेळी कोणीही मदतीला धावून येऊ शकले नाही. आजच्या भेटीदरम्यान डॉ. ढवळे यांनी जिल्हा सोडून जाण्याचा निर्णय घेऊ नये व आपण आजपर्यंत जनतेची जी सेवा केली तशीच सेवा करावी. या रूग्णालयात लहान मुलांच्या आजाराविषयी ज्या अडचणी येतात त्या तुम्ही चांगल्याप्रकारे हाताळता. आज हजारो बालके तुम्ही चांगली केली आहेत. जिल्हा रूग्णालयाला तुमच्यासारखा वैद्यकीय अधिकारी मिळाला आहे, अशी त्यांच्याकडे सर्वांनी विनवणी केली.यावेळी भाजपचे शिष्टमंडळाचे माजी आमदार प्रमोद जठार, राजन तेली, काका कुडाळकर, प्रभाकर सावंत, राजश्री धुमाळे, अतुल काळसेकर, जयदेव कदम यांनी डॉ. आर. डी. माने व डॉ. विजय ढवळे यांची भेट घेतली. (वार्ताहर)