शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

कोणता झेंडा घेऊ हाती? दीपक केसरकर शिंदे गटात, पण समर्थक संभ्रमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 20:19 IST

Deepak Kesarkar : शिवसैनिकांची ही केसरकरांना साथ मिळताना दिसून येत नाही. तर दुसरीकडे केसरकर हे सुद्धा आपण अद्याप शिवसेनेतच असल्याचे जरी सांगत असले तरी शिवसेना ही ते मान्य करण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे.

- अनंत जाधव 

सावंतवाडी : शिवसेना आमदार दीपक केसरकर हे जरी शिंदे गटात सामील झाले असले तरी त्यांच्या सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील शिवसैनिक अद्यापही संभ्रमावस्थेत असून दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस वगळता एकानेही अद्याप आपण केसरकर यांच्या सोबत जाण्याचे जाहीर केले नाही. मात्र दुसरीकडे भविष्यातील धोका ओळखून शिवसेना अ‍ॅक्शन मोडवर आली असून केसरकर समर्थकांना वेळीच पदावरून दूर करण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे भविष्यातील बंडखोरी टाळण्यास मदत होणार आहे.

महाराष्ट्रात जे सत्ता नाट्य घडले, त्यात सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ सुद्धा कुठे मागे नाही, येथील शिवसेना आमदार दीपक केसरकर यांनीही 40 आमदारांसोबत शिंदे गटात सामील होत शिवसेनेला मोठा हादरा दिला असला तरी या हादऱ्याचे पडसाद सावंतवाडी विधानसभा मतदार संघात उमटताना कुठेही दिसत नाही. शिवसैनिकांची ही केसरकरांना साथ मिळताना दिसून येत नाही. तर दुसरीकडे केसरकर हे सुद्धा आपण अद्याप शिवसेनेतच असल्याचे जरी सांगत असले तरी शिवसेना ही ते मान्य करण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे केसरकर समर्थकांची अवस्था चलबिचल झाली आहे.

कोणीही उघडपणे आपण केसरकर यांच्यासोबत असल्याचे त्यांचे समर्थक सांगत नाही आणि दुसरीकडे शिवसेनेच्या बैठकांनाही येत नाही, अशा केसरकर समर्थकावर शिवसेनेकडून लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. त्यातूनच दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांना बदलून संजय गवस यांच्याकडे तालुकाप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर सावंतवाडीतील महिला शहरप्रमुख ही बदलण्यात आले असून या पदावर श्रृतिका दळवी यांची निवड करण्यात आली आहे. मात्र इतर पदाधिकाऱ्यांची पदे अद्याप जैसे थे ठेवण्यात आली आहेत.

केसरकर यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी, राघोजी सावंत तसेच वेंगुर्ले व दोडामार्ग तालुक्यातील काही पदाधिकारी अद्याप ही संभ्रमावस्थेत आहेत. ते केसरकर यांचीच सोबत करणार असले तरी पुढे कोणता झेंडा हाती घ्याचा, असा प्रश्न त्यांना सतावू लागला आहे. पण सध्यातरी केसरकर यांनी शिवसेनेतच कायम असल्याचे जाहीर केले असले तरी मूळ शिवसैनिक मात्र केसरकर यांना स्वीकारण्याच्या मानसिकतेत दिसत नाहीत. त्यामुळे केसरकर यांना समर्थकांना जर राजकीय प्रवाहात आणण्याचे झाल्यास कोणतातरी झेंडा हातात घेतल्याशिवाय पर्याय उरणार नाही.

विनायक राऊतांची चालाखी शिवसेनेच्या पथ्यावर 2014 मध्ये केसरकर हे राष्ट्रवादी काँग्रेस मधून शिवसेनेत आले, तेव्हा केसरकर यांना शिवसेनेने आमदार केले. त्यानंतर मंत्रिपदही दिले पण केसरकर यांच्या ताब्यात ना जिल्ह्यातील संघटना दिली, ना त्यांच्या मतदारसंघातील दिली. त्यामुळेच आज जरी केसरकर शिंदे गटात गेले तरी पक्षाचा लहान मोठा पदाधिकारी शिवसेनेसोबत असल्याचा दिसून येत असून तेव्हाची विनायक राऊतांची ही खेळी शिवसेनेच्या पथ्यावर पडल्याचे दिसून आले.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Shiv Senaशिवसेना