शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Deepak Kesarkar :..अन्यथा केसरकरांना मतदान करणार नाही, मराठा मोर्चा संयोजकांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 14:52 IST

आगामी निवडणुकीत मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास केसरकरांना समाज मतदान करणार नाही, असा इशारा सकल मराठा समाज संयोजकांनी दिला आहे.

ठळक मुद्दे..अन्यथा केसरकरांना मतदान करणार नाही, मराठा मोर्चा संयोजकांची माहिती  पालकमंत्र्यांचे मराठा समाजाकडे दुर्लक्ष

कणकवली : मराठा समाजाला आरक्षण मिळावे व अन्य मागण्यांसाठी सकल मराठा समाजाने शासनाला जाग आणण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी शासनाच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे.

सकल मराठा समाजाने ९ आॅगस्टला राज्यभर जेलभरो आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येक तालुकावार जेलभरो आंदोलन केले जाणार आहे. त्याप्रमाणे कणकवली तालुक्यातही सकल मराठा समाजाच्यावतीने जेलभरो आंदोलन छेडण्यात येणार आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर राज्यात गृहमंत्री म्हणून फिरत आहेत. मात्र सिंधुदुर्गातील मराठा समाजाकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास केसरकरांना समाज मतदान करणार नाही, असा इशारा सकल मराठा समाज संयोजकांनी दिला आहे.कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कणकवली तालुका सकल मराठा समाजाचे एस. टी. सावंत, लवू वारंग, सोनू सावंत, सुशांत नाईक, राजू रावराणे, समर्थ राणे, महेंद्र सांब्रेकर, बच्चू प्रभुगांवकर, भाई परब, सदाशिव राणे, सुशिल सावंत, दिलीप तळेकर, अनुप वारंग, अ‍ॅड. हर्षद गावडे, सादिक कुडाळकर, महेंद्र गावकर आदी समाजबांधव उपस्थित होते.सकल मराठा समाजाच्यावतीने मराठा समाजाला आरक्षण मिळावे या आणि अन्य मागण्यांसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाबंद आणि रास्तारोको आंदोलन सुरू आहेत. शासनाला जाग आणण्यासाठी हे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचाच एक भाग म्हणून मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी जी क्रांती निर्माण झाली आहे ती क्रांती आणखी उभी राहण्यासाठी ९ आॅगस्ट रोजी क्रांती दिनादिवशी जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे.शासनास सर्व मागण्या मान्य करण्यास भाग पाडण्यासाठी जेलभरो आंदोलन छेडणार आहोत. या जेलभरो आंदोलनात कणकवली तालुका सकल मराठा समाज बांधवांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे. या आंदोलनात मराठा समाजातील युवक-युवती महिला, तसेच विद्यार्थी आणि मराठा सामाजिक, शासकीय-निमशासकीय संघटनांनी सहभागी व्हावे असे आवाहनही करण्यात आले.२ आॅगस्ट रोजी नियोजनाची बैठक पार पडली. या बैठकीत ९ आॅगस्टच्या आंदोलनाबाबत विचार विनिमय करण्यात आला. हे जेलभरो आंदोलन यशस्वी करण्यासाठी सर्व मराठा बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सकल मराठा समाजातर्फे करण्यात आले. २ वर्षांपूर्वी मराठा क्रांती मोर्चाने मराठा समाज आरक्षणासाठी आंदोलन केले होते. त्याचप्रमाणे या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.रास्तारोको आंदोलनात मराठा समाज बांधवांवर पोलिसांनी गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. ते गुन्हे शासनाने मागे घ्यावेत अशी मागणी सकल मराठा समाजाने केली आहे. त्या मराठा बांधवांच्या पाठीशी मराठा समाज उभा आहे. शासनाने जर मराठा समाजाची आरक्षणाची मागणी मान्य केली नाही तर यापुढे मराठा समाज शासनाला असहकार करेल असा इशारा मराठा समाज संयोजकांनी दिला आहे. इतर समाज बांधवांनी या मराठा आरक्षणाला पाठिंबा द्यावा, अशी मागणीही करण्यात आली.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणsindhudurgसिंधुदुर्गDeepak Kesarkarदीपक केसरकर