म्हाडाच्या कोवीड रूग्णालयाचे पवार यांच्या हस्ते लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 15:29 IST2021-06-16T15:20:44+5:302021-06-16T15:29:31+5:30

CoronaVIrus Sindhudurg : सिंधूदूर्ग जिल्ह्य़ात कोकण म्हाडांतर्गत सुरू होणाऱ्या विशेष कोवीड रूग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात आले असून त्याचे ऑनलाईन लोकार्पण खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते शुक्रवार दि. १८ जून रोजी ओरोस येथे होणार आहे.

Dedication of Kovid Hospital under MHADA by Pawar | म्हाडाच्या कोवीड रूग्णालयाचे पवार यांच्या हस्ते लोकार्पण

म्हाडाच्या कोवीड रूग्णालयाचे पवार यांच्या हस्ते लोकार्पण

ठळक मुद्देम्हाडातंर्गत होणाऱ्या कोवीड रूग्णालयाचे पवार यांच्या हस्ते लोकार्पण१८ जून रोजी कार्यक्रम, आव्हाड, उदय सामंत उपस्थित राहणार :अमित सामंत 

सिंधुदुर्ग : सिंधूदूर्ग जिल्ह्य़ात कोकण म्हाडांतर्गत सुरू होणाऱ्या विशेष कोवीड रूग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात आले असून त्याचे ऑनलाईन लोकार्पण खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते शुक्रवार दि. १८ जून रोजी ओरोस येथे होणार आहे.

शुक्रवार दि. १८ जून रोजी संध्याकाळी साडे चार वाजता जिल्हा समादेशक इमारत (होमगार्ड) ओरोस येथे होणा या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती गृह निर्माण मंञी जितेंद्र  आव्हाड तसेच पालकमंत्री  उदय सामंत यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाला खा. विनायक राऊत, आमदार दिपक केसरकर, आमदार वैभव नाईक. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी,  जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, जिल्हा शल्य चिकित्सक श्रीपाद पाटील हे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दिली आहे.

Web Title: Dedication of Kovid Hospital under MHADA by Pawar