शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

आंबोलीत दरीत कोसळून तरूणाचा मृत्यू, ओवळीये गावावर शोककळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 14:55 IST

आंबोली-महादेवगड या पर्यटन स्थळाच्या पायथ्याशी असलेल्या सिद्धेश्वर देवस्थानांचे दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या ओवळीये वरचीवाडी येथील तरुण विश्वास गणू सावंत (४०) यांचा खोल दरीत कोसळून मृत्यू झाला.

ठळक मुद्देआंबोलीत दरीत कोसळून तरूणाचा मृत्यू, ओवळीये गावावर शोककळा महादेवगड येथे पायवाट उतरत असताना पाय घसरला

आंबोली (सिंधुदुर्ग) : आंबोली-महादेवगड या पर्यटन स्थळाच्या पायथ्याशी असलेल्या सिद्धेश्वर देवस्थानांचे दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या ओवळीये वरचीवाडी येथील तरुण विश्वास गणू सावंत (४०) यांचा खोल दरीत कोसळून मृत्यू झाला.

विश्वास हे पायवाट उतरत असताना पाय घसरून तोल गेल्याने सुमारे तीस फूट खाली खडकाळ दरीत ते कोसळले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर मार बसला. ही घटना रविवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास घडली. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या मित्रांनी याबाबत आंबोली पोलिसांना माहिती दिली.

सोमवारी सकाळी सुहास सावंत, सखाराम सावंत, शशांक सावंत, नीतेश सावंत, राजेश सावंत व विश्वास देसाई हे मित्रमंडळी दरवर्षी सिद्धेश्वर येथे एक रात्र मुक्काम करण्यासाठी म्हणून जात असत. यावेळीही हे मित्र आपल्या चारचाकी वाहनाने दाणोली बाजार येथे जेवणाचे साहित्य खरेदी करून आंबोली महादेवगड येथे पोहोचले. त्यांनी महादेवगड येथूनच खाली पारपोली गावाकडे जाणाऱ्या दरीतील पायवाटेने मार्गक्रमण सुरू केले.

सुमारे दीडशे फूट दरीतील रस्ता उतरल्यावर राजेश सावंत यांच्या मागे असलेला विश्वास देसाई यांचा पाय घसरला व तो तीस फूट खाली दरीमध्ये कोसळला. लागलीच त्याच्या मित्रांनी त्याला पायवाटेवरून खाली जात मोबाइल बॅटरीच्या उजेडमध्ये त्याचा शोध घेतला.

त्यावेळी विश्वास हा एका झाडीमध्ये निपचित पडलेला आढळून आला. त्यांनी विश्वासला खाली घेतले व वाटेवर ठेवले परंतु कोणती हालचाल त्यांच्यामध्ये आडळून आली नाही . तो जागीच मृत झाला असावा असा अंदाज त्यांच्या मित्रांनी बांधला.यानंतर सुहास सावंत यांनी आपल्या इतर मित्रांना विश्वास जवळ ठेवून आंबोली पोलीस स्थानकात रात्री दहा वाजताच्या सुमारास याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विश्वास सावंत व कॉन्स्टेबल राजेश गवस यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. परंतु रात्रीच्या अंधारात बचाव कार्य करणे शक्य नसल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी मोहीम राबवून त्यांना दरीतून बाहेर काढण्यात आले.ओवळीये गावच्या जत्रेदिवशीच दुर्घटनाआंबोली आपत्कालीन व्यवस्थापनाचे मायकल डिसोजा, राजू राऊळ, उत्तम नार्वेकर, अजित नार्वेकर, विशाल बांदेकर, अतुल बांदेकर यांनी सोमवारी सकाळी दहा वाजेपर्यंत ही मोहीम पार पाडली. तसेच विश्वास देसाई यांचा मृतदेह दरीतून वर आणला.

विश्वास हे ओवळिये गावामध्ये मोलमजुरीचे कामे करत असत. त्यांच्या पक्षात आई, वडील, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. नेमकी सोमवारी सोमवारी ओवळीये गावाची जत्रा असल्याने या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली होती. या घटनेबाबत अधिक तपास विश्वास सावंत पोलीस कॉन्स्टेबल राजेश गवस करत आहेत.

टॅग्स :Amboli hill stationआंबोलि हिल स्टेशनAccidentअपघातsindhudurgसिंधुदुर्ग