कुंभवडेतील शेतकऱ्याचा सर्पदंश झाल्याने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 16:17 IST2019-12-14T16:16:20+5:302019-12-14T16:17:08+5:30
वैभववाडी : कुंभवडे चव्हाणवाडी येथील सर्पदंश झालेले रामदास शिवराम चव्हाण (६३) या शेतकऱ्याचा अखेर मृत्यू झाला. कणकवली एका खासगी ...

कुंभवडेतील शेतकऱ्याचा सर्पदंश झाल्याने मृत्यू
वैभववाडी : कुंभवडे चव्हाणवाडी येथील सर्पदंश झालेले रामदास शिवराम चव्हाण (६३) या शेतकऱ्याचा अखेर मृत्यू झाला. कणकवली एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना गुरुवारी रात्री ही घटना घडली.
रामदास चव्हाण हे गुरुवारी सकाळी शेतात गवत आणायला गेले होते त्यावेळी त्यांना सर्पदंश झाला. त्रास जाणवू लागल्याने त्यांना वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना कणकवली येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
चव्हाण यांचा गावातील सामाजिक कार्यात पुढाकार होता. त्यामुळे त्यांच्या निधनाबद्दल कुंभवडे व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, सुना, नातवंडे, भाऊ असा मोठा परिवार आहे.