तोल जाऊन खाडीत कोसळल्यामुळे पेडणेच्या एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 14:06 IST2019-01-29T14:05:21+5:302019-01-29T14:06:26+5:30
सावंतवाडी तालुक्यातील सातार्डा पुलानजीक पायऱ्यावरून उतरताना तोल जाऊन खाली कोसळल्यामुळे अनंत राजाराम बागकर(७२, रा.पेडणे गडेकर भाटले, उत्तर गोवा) यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचा मुलगा अवधूत अनंत बागकर याने सावंतवाडी पोलिसात याबाबतची फिर्याद दिली आहे.

तोल जाऊन खाडीत कोसळल्यामुळे पेडणेच्या एकाचा मृत्यू
सावंतवाडी : तालुक्यातील सातार्डा पुलानजीक पायऱ्यावरून उतरताना तोल जाऊन खाली कोसळल्यामुळे अनंत राजाराम बागकर(७२, रा.पेडणे गडेकर भाटले, उत्तर गोवा) यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचा मुलगा अवधूत अनंत बागकर याने सावंतवाडी पोलिसात याबाबतची फिर्याद दिली आहे.
बागकर काल सायंकाळच्या सुमारास घरातून निघून गेले, ते उशिरापर्यंत घरी परतले नाही.त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी रात्रभर त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान सकाळी सातार्डा पुलानजीक असलेल्या पायऱ्यावर त्यांचा मृतदेह आढळून आला. याबाबत सावंतवाडी पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास उपपोलिस निरीक्षक लक्ष्मण गवस करीत आहेत.