शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: शुकनदी पुलानजीक झालेल्या अपघातातील जखमीचा मृत्यू, एडगावचे ग्रामस्थ आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2024 17:08 IST

पोलिसात धाव घेत ट्रक चालक व मालकाला हजर करण्याची मागणी

वैभववाडी (सिंधुदुर्ग): वैभववाडी-एडगाव दरम्यानच्या शुकनदी पुलानजीक झालेल्या काल, मंगळवारी झालेल्या अपघातातील जखमी रामचंद्र आकाराम रावराणे (वय-७०) यांचा मृत्यू झाला. रावराणे यांच्या मृत्यूनंतर संतप्त झालेल्या एडगाव ग्रामस्थांनी आज बुधवारी सकाळी पोलिस ठाण्यात धाव घेत ट्रक चालक व मालकाला तात्काळ हजर करण्याची मागणी केली.ट्रकचा चालक व मालकाला हजर करीत नाही; तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली. सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील अवसमोल यांच्या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी आपला निर्णय मागे घेतला.काल, मंगळवारी रात्रीच्या सुमारास शुकनदी पुलानजीक ट्रकने पाठीमागून दुचाकीला जोरदार धडक दिली. यात एडगावचे रामचंद्र रावराणे व दुचाकीवरील बबलू नामक एक व्यक्ती जखमी झाले. रावराणे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना कणकवलीत नेण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला होता. मात्र त्यापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक चालक पसार झाला होता. तो अद्याप पोलिस स्थानकात हजर न झाल्याने एडगाव येथील ग्रामस्थ आक्रमक झाले. त्यांनी थेट पोलिस स्थानक गाठत फरार चालक व मालक यांना तात्काळ हजर करा अशी मागणी केली. त्यांना हजर न केल्यास मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही; अशी भूमिका घेतली.अखेर सहाय्यक निरीक्षक अवसरमोल यांनी ग्रामस्थांची समजूत काढली. ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस शोध घेत असल्याचे सांगितले. तसेच काही तासात दोघांनाही पोलिस स्थानकात हजर करण्यात येईल असा आश्वासन दिले. त्यानंतर एडगावचे ग्रामस्थ शांत झाले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAccidentअपघातDeathमृत्यू