Damdati's days are over, now the era of development: Uday Samant | दमदाटीचे दिवस संपले, आता विकासाचे पर्व :उदय सामंत

वैभववाडी नगरपंचायत कार्यक्षेत्रातील शेकडो कार्यकर्त्यांनी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी अरुण दुधवडकर, सतीश सावंत, अतुल रावराणे, संदेश पारकर आदी उपस्थित होते.

ठळक मुद्देदमदाटीचे दिवस संपले, आता विकासाचे पर्व :उदय सामंत वैभववाडीत शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

वैभववाडी : विकासाची स्वप्ने अनेकांनी दाखविली, परंतु खरा विकास काय असतो हे आता आम्ही दाखवून देत आहोत. त्यामुळे दमदाटी, धाकदपटशाहीचे दिवस संपले असून विकासाचे पर्व सुरू झाले आहे, असे मत पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले.

येथील नगरपंचायतीनजीकच्या मंचावर शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. या कार्यक्रमात इतर पक्षांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी खासदार विनायक राऊत, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, सतीश सावंत, अतुल रावराणे, संदेश पारकर, दिगंबर पाटील, संदेश पटेल, मंगेश लोके, नंदू शिंदे, विठ्ठल बंड, रमेश तावडे, प्रदीप रावराणे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री सामंत म्हणाले, जिल्ह्यातील काही नेत्यांनी विकास हा स्वत:च्या स्वार्थाभोवताली मर्यादितच ठेवला. त्यासाठी त्यांनी सर्व अस्त्रांचा वापर केला. प्रसंगी आडवे येणाऱ्यांना दमदाटी करीत होते. परंतु दादागिरीचे पर्व आता संपले आहे. आम्ही विकासाचे पर्व सुरू केले आहे. त्यामुळे आता कुणीही घाबरण्याचे कारण नाही. ज्या कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला आहे, त्यांनी निर्धास्तपणे काम करावे.

कणकवलीत परिवर्तन सुरू

कुडाळ-मालवण, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात यापूर्वीच परिवर्तन झालेले आहे. परंतु सध्या परिवर्तनाचे वारे कणकवली विधानसभा मतदारसंघात वाहू लागले आहेत. आज कणकवलीत शेकडो लोकांनी प्रवेश केले, तर वैभववाडीतदेखील खुल्या मैदानात कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे. ही परिवर्तनाची नांदी आहे. त्यामुळे २०२४ मध्ये कणकवलीत शिवसेनेचाच आमदार असेल, असे मत खासदार राऊत यांनी व्यक्त केले.

 

Web Title: Damdati's days are over, now the era of development: Uday Samant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.