आचरा येथे घरावर झाड पडून नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 19:37 IST2021-06-14T19:34:21+5:302021-06-14T19:37:43+5:30
Rain Sindhudurg : गेले दोन दिवस सोसाट्याच्या वारयांसह मुसळधार कोसळणारया पावसाने आचरा परीसराला चांगलेच झोडपले आहे. सोमवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास आचरा हिर्लेवाडी अशोक मुरलीधर मुणगेकर यांच्या घरावर भलेमोठे रतांबीचे झाड कोसळून नुकसान झाले आहे. यात घराच्या पडवीच्या पत्र्यांचे नुकसान झाले असून लगतच्या विद्युत वाहिन्यांवरही हे झाड कोसळल्याने वीज वितरणचेही नुकसान झाले आहे.

आचरा येथे घरावर झाड पडून नुकसान
आचरा :गेले दोन दिवस सोसाट्याच्या वारयांसह मुसळधार कोसळणारया पावसाने आचरा परीसराला चांगलेच झोडपले आहे.
सोमवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास आचरा हिर्लेवाडी अशोक मुरलीधर मुणगेकर यांच्या घरावर भलेमोठे रतांबीचे झाड कोसळून नुकसान झाले आहे. यात घराच्या पडवीच्या पत्र्यांचे नुकसान झाले असून लगतच्या विद्युत वाहिन्यांवरही हे झाड कोसळल्याने वीज वितरणचेही नुकसान झाले आहे.
गेले दोन दिवस सोसाट्याच्या वारयांसह मुसळधार कोसळणारया पावसाने जोर धरला आहे याचा फटका आज मुणगेकर यांच्या घराला बसला आहे घरापासून काही अंतरावर असलेले झाड मुळापासून तुटुन पडत विद्युत विद्युतवाहिनीवर पडत घरावर कोसळले.
विद्युत प्रवाह बंद झाल्याने अनर्थ टळला. घटनेची खबर मिळताच आचरा सरपंच प्रणया टेमकर, उपसरपंच पांडुरंग वायंगणकर, पस सदस्य निधी मुणगेकर, पोलीस पाटील जगन्नाथ जोशी जयप्रकाश परुळेकर दाखल होत पाहणी केली
आचरा हिर्लेवाडी अशोक मुरलीधर मुणगेकर याच्या घरावर रातंबीचे झाड पडुन नुकसान झाले.