वैभववाडी बाजारपेठेत मोबाईल शॉपीवर डल्ला, लाखाचा मुद्देमाल लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 15:29 IST2019-12-02T15:28:16+5:302019-12-02T15:29:11+5:30

वैभववाडी बाजारपेठेतील हॅलो मोबाईल शॉपी फोडून अज्ञात चोरट्याने सुमारे १ लाख रुपये किमतीचे मोबाईल लंपास केले. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. याबाबत मोबाईल शॉपीचा मालक इम्तियाज इक्बाल काझी (रा. तिथवली) याने वैभववाडी पोलिसांत तक्रार दिली असून अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

 Dallas, Lakha issue issues on mobile shop in Vaibhavwadi market | वैभववाडी बाजारपेठेत मोबाईल शॉपीवर डल्ला, लाखाचा मुद्देमाल लंपास

वैभववाडी बाजारपेठेत मोबाईल शॉपीवर डल्ला, लाखाचा मुद्देमाल लंपास

ठळक मुद्दे वैभववाडी बाजारपेठेत मोबाईल शॉपीवर डल्ला, लाखाचा मुद्देमाल लंपास अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

वैभववाडी : वैभववाडी बाजारपेठेतील हॅलो मोबाईल शॉपी फोडून अज्ञात चोरट्याने सुमारे १ लाख रुपये किमतीचे मोबाईल लंपास केले. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. याबाबत मोबाईल शॉपीचा मालक इम्तियाज इक्बाल काझी (रा. तिथवली) याने वैभववाडी पोलिसांत तक्रार दिली असून अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, गुरुवारी दुपारनंतर बाजारपेठ बंद असल्याने इम्तियाज बाहेर गेला होता. त्यामुळे शुक्रवारी मोबाईल शॉपी बंदच होती. शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे त्याने शॉपी उघडली तेव्हा साहित्य विस्कटलेले आढळले. तसेच मोबाईल गायब असल्याचे लक्षात आले.

चोरट्याने शॉपी बाजूने फोडून सुमारे लाखभर रुपये किमतीचे मोबाईल व अन्य वस्तू लंपास केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. काझी याच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदवला असून पोलीस ठाण्यापासून ५० मीटरवरील मोबाईल शॉपी लुटल्यामुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Web Title:  Dallas, Lakha issue issues on mobile shop in Vaibhavwadi market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.