शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

विज्ञानाचा दैनंदिन वापर अत्यावश्यक

By admin | Updated: December 25, 2014 00:06 IST

मुक्ता दाभोलकर : भारतीय संविधानाला प्रमाण मानून कार्य सुरु

राजापूर : विज्ञानाने जगाकडे कसे पाहावे, याची दृष्टी आपल्याला दिली असल्याने त्याचा वापर दैनंदिन जीवनात होणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या वागण्यात तसा बदल केल्यास खऱ्या अर्थाने अंधश्रद्धा निर्मूलन होईल, असा आशावाद महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या व नरेंद्र दाभोलकर यांच्या सुकन्या मुक्ता दाभोलकर यांनी पाचल येथे व्यक्त केला.पाचलमध्ये दिवंगत स्वातंत्र्यसैनिक गो. बा. तथा आबा नारकर यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून अंधश्रद्धा निर्मूलनावर पाचलमधील ग्रामसचिवालयाच्या सभागृहात कार्यशाळा व व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.समाज परिवर्तनाच्या चळवळीशी प्रत्येकाने आपला सहभाग नोंदवणे आवश्यक आहे. त्यातूनच अंश्रद्धा निर्मूलनासाठी व्यापक समाज परिवर्तन घडवता येईल. त्यामुळे जगाचे निश्चितच कल्याण होईल, असे सांगून मुक्ता दाभोलकर यांनी विज्ञानावर मत मांडले.आपण विज्ञानाची सृष्टी घेतली, पण दृष्टी घेतली नाही. एकीकडे मंगळावर जाण्याची तयारी चालवली जाते, तर दुसरीकडे मंगळ असलेल्या मुलीच्या विवाहात समाजाकडून असलेला विरोध घालवण्यासाठी आपण वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगला पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.भारतीय संविधानाला प्रमाण मानून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य सुरु आहे. सर्व जाती धर्मांचा आपण आदर करत आलो आहोत. तथापि धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या अघोरी प्रथा व अनिष्ठ रुढी, परंपरा यांना आळा बसावा, यासाठी समितीने लढा उभारताच जादुटोणा कायदा अस्तित्त्वात आला. त्यातूनच वर्षभरात सहा नरबळी टळले, ही डॉ. दाभोलकरांना श्रद्धांजली ठरली आहे, असे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.या कार्यशाळेदरम्यान सर्पांविषयी वाटणारी भीती कशी अनाठायी आहे. त्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. पाचल परिसरात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जयप्रकाश नारकर होते. या कार्यक्रमाला पाचल गावच्या सरपंच अपेक्षा मासये, स्नेहा नेने यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)दाभोलकर म्हणतात..., व्यापक समाज परिवर्तनासाठी अंधश्रध्दा निर्मूलन आवश्यक.विज्ञानाची आपण सृष्टी घेतली, पण दृष्टी घेतली नाही.वागण्यात बदल केल्यास खऱ्या अर्थाने अंधश्रध्दा निर्मूलन होईल.