शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

कर्ली पुलाची सुरक्षितता धोक्यात, बेकायदा वाळूची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 17:52 IST

sand, malvan, police, sindhudurngnews कर्जबाजारी झालेल्या वाळू व्यावसायिकांसमोर अनेक आव्हाने असल्याने त्यांना नाईलाजाने वाळू व्यवसाय करावा लागत आहे. परंतु बेसुमार वाळू उत्खनन केल्यामुळे नदीचे पात्र रुंदावल्याने लोकवस्ती, शेतजमिनी, माडबागायतींचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

ठळक मुद्दे कर्ली पुलाची सुरक्षितता धोक्यात, बेकायदा वाळूची लूटबंदी असताना जिल्ह्यात राजरोस वाळू उपसा सुरू

सिद्धेश आचरेकरमालवण : कर्जबाजारी झालेल्या वाळू व्यावसायिकांसमोर अनेक आव्हाने असल्याने त्यांना नाईलाजाने वाळू व्यवसाय करावा लागत आहे. परंतु बेसुमार वाळू उत्खनन केल्यामुळे नदीचे पात्र रुंदावल्याने लोकवस्ती, शेतजमिनी, माडबागायतींचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

मालवण-वेंगुर्ला तालुके जोडणाऱ्या देवली येथील कर्ली पुलाची स्थिती गंभीर बनली आहे. राजरोसपणे होणाऱ्या वाळू उपशामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या सागरी महामार्गावरील कर्ली पुलाची सुरक्षितता धोक्यात आली आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाळू उत्खननाला शासनाची परवानगी नाही. मात्र, अनधिकृत वाळू उत्खननाला पेव फुटले आहे. मालवण तालुक्यातील कालावल खाडी, मालवण व कुडाळ तालुक्याला लागून असलेली कर्ली खाडी, वेंगुर्ला तालुक्यातील चिपी येथे वाळूचे मोठ्या प्रमाणात उत्खनन होत आहे. या उत्खननाबाबत ग्रामस्थांनी प्रशासनास निवेदन देत आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्यानुसार महसूल प्रशासनाने अनधिकृत वाळू रॅम्प उद्ध्वस्त करून कारवाईचा बडगा उगारला.५० मीटरवर उत्खननकर्ली पुलापासून अवघ्या ५० मीटर अंतरावर वाळू उत्खनन जोरात सुरू असल्याचा आरोप मनसे पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केला होता. देवली-वाघवणे येथे खाडीलगत १८०० मीटरचा खारबंधारा आहे. अवैध वाळू उत्खननामुळे सुमारे ६०० मीटर खारबंधारा खचून गेला आहे. भविष्यात पूरस्थिती निर्माण झाल्यास खारबंधारा फुटून ग्रामस्थ व शेतकऱ्यांची घरे, शेतजमिनी, माडबागायतींचे अस्तित्वच धोक्यात येऊ शकते, अशी भीती ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.१०० डंपरनी वाळू वाहतूकवाळू व्यावसायिकांकडून रात्रंदिवस बेसुमार अवैध वाळू उपसा केला जात आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार दरदिवशी ७० ते ८० होड्यांनी अवैध वाळू उपसा होते. त्यानंतर १०० डंपरनी वाळू वाहतूक जिल्ह्यात तसेच गोव्यात केली जाते. पोलीस, महसूल कर्मचारी, तहसीलदार, प्रांत डोळ्यावर पट्टी बांधून आहेत का ? महसूल अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सुरू असलेल्या या वाळू उपशामुळे कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे, असा आरोप मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केला.

जिल्ह्यातील नद्यांच्या पुरांनी दाखविलेला रुद्रावतार हा वाळू उपशाचाच परिमाण आहे. नदी ही जीवनरेषा आहे. गावा-गावांनी नीडरपणे अवैध वाळू उपशाविरुद्ध उभे राहणे आवश्यक आहे. इतर देशांनी अवलंबिलेल्या शाश्वत उपायांचा किंवा प्लास्टिकग्रीड, जिओग्रीड अशा वाळूला असणाऱ्या विकल्पांचा अंगीकार करणे जिकिरीचे आहे. यामुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होत आहे. त्यामुळे यावर कडक निर्बंध घालणे आवश्यक आहे.- प्रा. हसन खान, पर्यावरण अभ्यासक

टॅग्स :sandवाळूMalvan beachमालवण समुद्र किनाराsindhudurgसिंधुदुर्गPoliceपोलिस