शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
2
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
3
U19 Asia Cup 2025 : कोण आहे Aaron George? पाक विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियासाठी ठरला ‘संकटमोचक’
4
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
5
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
6
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
7
Nitin Nabin: चार वेळा आमदार, बिहारमध्ये मंत्री; भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नबीन कोण आहेत?
8
सिडनी येथे जगप्रसिद्ध बॉन्डी बीचवर अंदाधुंद गोळीबार; दोन हल्लेखोर ताब्यात, १० पर्यटकांचा जीव घेतला
9
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
10
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
11
बंगालमध्ये बिहारपेक्षाही अधिक मतांना कात्री, आकडा ५८ लाखांवर; टॉप-5 मध्ये ममतांचाही मतदारसंघ! TMC चं टेन्शन वाढणार?
12
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
13
पीएम सूर्य घर : मोफत वीज योजनेसाठी कसा करायचा ऑनलाईन अर्ज? सोपी आहे पद्धत, एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
14
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
15
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
16
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
Daily Top 2Weekly Top 5

महिलांच्या नेतृत्वाने देश आर्थिक महासत्ता होईल : गावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 18:08 IST

Women's Day Special sindhudurg- देशाला आर्थिक महासत्ता बनविण्याचे काम महिलाच करू शकतील. महिलांनी पुढे येऊन नेतृत्व केल्यास आपला देश सक्षम झाल्याशिवाय राहणार नाही, असे उद्गार कृषिभूषण एम. के. गावडे यांनी वेंगुर्ला येथे काढले.

ठळक मुद्देमहिलांच्या नेतृत्वाने देश आर्थिक महासत्ता होईल : गावडे महिला काथ्या कामगार संस्थेतर्फे महिला दिन साजरा

वेंगुर्ला : देशाला आर्थिक महासत्ता बनविण्याचे काम महिलाच करू शकतील. महिलांनी पुढे येऊन नेतृत्व केल्यास आपला देश सक्षम झाल्याशिवाय राहणार नाही, असे उद्गार कृषिभूषण एम. के. गावडे यांनी वेंगुर्ला येथे काढले.महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्था तसेच कॉयर बोर्ड भारत सरकार यांच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित काथ्या उद्योगावर आधारित कार्यशाळा कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, कोकम, आंबा, काजू, नारळ, जांभूळ, करवंद, अननस, फणस या फळांवर प्रक्रिया केल्यास खूप मोठी आर्थिक उलाढाल होऊ शकेल. काथ्या उद्योगात महिलांना मोठी संधी आहे. हा माल नाशिवंत नसल्याने घर कुटुंब चालवूनही महिला स्वयंरोजगार निर्माण करू शकतात.यावेळी व्यासपीठावर संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका प्रज्ञा परब, पंचायत समिती सभापती अनुश्री कांबळी, नगरपंचायत उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा दीपलक्ष्मी पडते, माजी नगराध्यक्षा नम्रता कुबल, सावंतवाडी माजी पंचायत समिती सभापती प्रियांका गावडे, निरवडे सरपंच प्रमोद गावडे, माजी उपनगराध्यक्ष वामन कांबळे, उद्योजिका सुजाता देसाई, रेडी ग्रामपंचायत सदस्या सायली पोखरणकर, कॉयर बोर्डचे अधिकारी विष्णू देवीदास, प्रविणा खानोलकर, कविता गोळम, प्रतिभा परब, राखी कळंगुटकर, राष्ट्रवादी शहराध्यक्ष सत्यवान साटेलकर, युवक तालुकाध्यक्ष रोहन वराडकर यांसह विविध संस्थांच्या महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या.या कार्यक्रमात देवगड येथील महिला उद्योजिका रंजना कदम, सभापती अनुश्री कांबळी, प्रियांका गावडे, वामन कांबळे, दिपलक्ष्मी पडते, अस्मिता राऊळ यांचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रुती रेडकर यांनी केले.महिला काथ्या संस्थेची यशस्वी घोडदौडकाथ्या उद्योगाच्या माध्यमातून सर्व महिलांच्या सहकार्याने महिला काथ्या संस्थेची यशस्वी घोडदौड सुरू आहे. यामुळे या माध्यमातून पुढे जाऊन सर्व महिलांना सक्षम करूया. महिला सबलीकरणासाठी कॉयर बोर्ड, कोकोनट बोर्ड व आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे प्रतिपादन यावेळी प्रज्ञा परब यांनी केले. 

टॅग्स :Women's Day Specialजागतिक महिला दिनsindhudurgसिंधुदुर्ग