शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

वॉटर फिल्टर-कुलर खरेदीमधील भ्रष्टाचाराची चौकशी होणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2021 7:31 PM

Politics VaibhavNaik Sindhudurg : वॉटर फिल्टर-कुलर खरेदीमध्ये ५० लाख रुपयांचा आर्थिक भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे.याबाबत ग्रामविकास मंत्री  हसन मुश्रीफ यांनी कोकण विभागीय आयुक्त यांना तत्काळ संबधित प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.

ठळक मुद्देवैभव नाईक यांच्या मागणीवरून ग्रामविकास मंत्र्यांचे आदेशसिंधुदुर्ग जिल्हा परिषद अंतर्गत विषय

कणकवली: सिंधुदुर्गजिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेमधून शाळांना पुरविलेल्या वॉटर फिल्टर-कुलर खरेदीमध्ये ५० लाख रुपयांचा आर्थिक भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे.याबाबत ग्रामविकास मंत्री  हसन मुश्रीफ यांनी कोकण विभागीय आयुक्त यांना तत्काळ संबधित प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.

सिंधुदुर्गजिल्हा परिषद शिक्षण विभागाने जिल्हा वार्षिक योजनेच्या नाविन्यपूर्ण योजनेमधून शाळांना पुरविलेल्या वॉटर फिल्टर-कुलर खरेदीमध्ये ५० लाख रुपयांचा आर्थिक भ्रष्टाचार करण्यात आला आहे.

याबाबत जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये जिल्हापरिषद सदस्य नागेंद्र परब यांनी पुराव्यांसहीत आर्थिक भ्रष्टाचार झाला असल्याचे सिद्ध केले. जिल्हा परिषद शाळांना जे वॉटर फिल्टर-कुलर पुरविण्यात आले त्यांची बाजारामध्ये १५ हजार रुपये किंमत असताना प्रत्यक्षात मात्र, २० हजार रुपयांपर्यंत ते खरेदी केल्याची बाब कागद पत्रांसाहित नागेंद्र परब यांनी उघड केली आहे.काही शाळांना कोरी बिले देखील देण्यात आली आहेत. यामुळे १००५ शाळांना वॉटर फिल्टर-कुलर पुरविताना किमान ५० लाख रुपयांचा आर्थिक भ्रष्टाचार केला गेला असल्याचे निष्पन्न होते. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद, शिक्षण विभागाने जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेमधून केलेल्या वॉटर फिल्टर-कुलर खरेदीमध्ये झालेल्या ५० लाख रुपयांच्या आर्थिक भ्रष्टाचाराची आपल्या स्तरावर चौकशी करण्याचे आदेश देण्यात यावेत. तसेच यामधील दोषींवर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश कोकण विभाग आयुक्त यांना देण्यात यावेत अशी मागणी आपण पत्राद्वारे हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे, असेही या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणVaibhav Naikवैभव नाईक Hasan Mushrifहसन मुश्रीफsindhudurgसिंधुदुर्गzpजिल्हा परिषद