Coronavirus : कोकण रेल्वेमार्गावर स्पेशल पार्सल ट्रेन; केरळमधून आलेले चिप्स कणकवली अन् रत्नागिरीत दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 15:35 IST2020-04-24T15:30:00+5:302020-04-24T15:35:27+5:30
केरळमधून आलेलं या चिप्सचं पार्सल कणकवली आणि रत्नागिरी स्थानकात उतरवली गेली आहेत.

Coronavirus : कोकण रेल्वेमार्गावर स्पेशल पार्सल ट्रेन; केरळमधून आलेले चिप्स कणकवली अन् रत्नागिरीत दाखल
कणकवलीः कोरोनामुळे लॉकडाऊनची स्थिती असताना कोकण रेल्वेच्या माध्यमातून कोकणासह दक्षिणेकडील राज्यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जातोय. याकरिता कोकण रेल्वेच्या मार्गावर रो रो व मालगाडीच्या बरोबरच स्पेशल पार्सल ट्रेन चालवल्या जात आहे. याच स्पेशल पार्सल ट्रेनमधून आज केरळमधून बनाना चिप्स कोकणात दाखल झाले आहेत. केरळमधून आलेलं या चिप्सचं पार्सल कणकवली आणि रत्नागिरी स्थानकात उतरवली गेली आहेत.
याच बरोबर उड्डापी येथून मडगाव येथे तीन टन माल उतरवला गेला. काल रात्री रत्नागिरी स्थानकात दाखल झालेल्या या पार्सल ट्रेनमधून रत्नगिरीचा हापूस आंबा अहमदाबाद येथे पाठवण्यात आला. कोरोनामुळे वाहतूक व्यवस्था ठप्प असल्याने आंबा व्यावसायिकांना राज्यात व राज्याबाहेर पाठविण्यात कोकण रेल्वे महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
रस्ते वाहतुकीपेक्षा निम्याहून कमी दरात आंब्याची वाहतूक कोकण रेल्वेच्या माध्यमातून होत आहे. 27 एप्रिलपासून कोकण रेल्वेच्या मार्गावर दुसरी पार्सल ट्रेन धावणार आहे.