CoronaVirus Lockdown : खारेपाटण येथे गोवा बनावटीची दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 16:32 IST2020-04-25T16:31:03+5:302020-04-25T16:32:25+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनातर्फे जाहीर करण्यात आलेल्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हा अन्वेषण पोलीस पथक गस्त घालत असताना खारेपाटण बाजारपेठ येथे अवैधरित्या ९४० रुपये किंमतीची गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे.

CoronaVirus Lockdown : खारेपाटण येथे गोवा बनावटीची दारू जप्त
कणकवली : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनातर्फे जाहीर करण्यात आलेल्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हा अन्वेषण पोलीस पथक गस्त घालत असताना खारेपाटण बाजारपेठ येथे अवैधरित्या ९४० रुपये किंमतीची गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे.
पोलीस पथक गस्त घालत असताना खारेपाटण बाजारपेठ येथील शिवाजी पेठ येथे वीरेंद्र बाळकृष्ण चिके (५९ , रा. खारेपाटण संभाजी नगर) हा बेकायदेशररित्या गोवा बनावटीची दारू विक्री करत असल्याप्रकरणी ताब्यात घेतले
आहे. यामध्ये ९४० रुपये किंमतीची दारू जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस नाईक सुयोग पोकळे यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
कनेडी येथील युवकाची आत्महत्या
कनेडी बाजारपेठ येथील मोतेस फिलिप डीसोझा (२३) या युवकाचा झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. ही घटना शुक्रवारी घडली. या युवकाने आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मात्र, त्यामागचे नेमके कारण समजू शकले नाही.
नाटळ येथील मल्हार नदीच्या काठी रातांब्याच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मोतेस फिलिप डीसोझा याचा मृतदेह आढळून आला. या घटनेबाबत पोलिसांना माहिती समजताच त्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. मोतेस याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.