शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

CoronaVirus Lockdown : भाजपची कोविड आपत्ती नियंत्रण समिती, नारायण राणे अध्यक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 16:38 IST

कुडाळ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रशासनात समन्वय नसून भविष्यात धोकादायक परिस्थिती उद्भवू नये यासाठी भाजपाच्यावतीने माजी मुख्यमंत्री नारायण राणे ...

ठळक मुद्देभाजपची कोविड आपत्ती नियंत्रण समिती, नारायण राणे अध्यक्ष सर्वपक्षीयांना विश्वासात घ्यावे; राजन तेलींचे आवाहन

कुडाळ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रशासनात समन्वय नसून भविष्यात धोकादायक परिस्थिती उद्भवू नये यासाठी भाजपाच्यावतीने माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली ३३ जणांची कोविड आपत्ती जिल्हा नियंत्रण समिती स्थापन करण्यात आली असल्याचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी  सांगितले.

आतातरी पालकमंत्र्यांनी कोणाचेही ऐकून पक्षीय राजकारण करू नये. या कोरोना आपत्तीविरोधात लढण्यासाठी सर्वपक्षीयांना विश्वासात घेऊन कार्यरत रहावे, असा सल्ला राजन तेली यांनी पालकमंत्री उदय सामंत यांना दिला.कुडाळ एमआयडीसीच्या शासकीय विश्रामगृहात झालेल्या या पत्रकार परिषदेवेळी जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई, जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, बंड्या सावंत, आनंद शिरवलकर आदी उपस्थित होते.तेली म्हणाले, भाजपाची जिल्ह्यातील सत्तास्थाने पाहता जिल्हा परिषद भाजपकडे असून यामध्ये ३१ सदस्य आहेत. तसेच पंचायत समिती ५, नगरपंचायती ६, मालवण व दोडामार्ग येथे उपनगराध्यक्ष, जिल्ह्यातील ७५ टक्के ग्रामपंचायती भाजपाच्या आहेत. त्यामुळे प्रत्येक गावपातळीवर आमचेच पदाधिकारी कार्यकर्ते जिल्ह्यातील कोरोना विरोधातील लढाईत खऱ्या अर्थाने गेले दोन महिने कार्यरत आहेत. मात्र, कोविड समिती स्थापन करताना पालकमंत्री यांनी याचा विचार केलेला दिसून येत नाही हे दुर्दैव आहे असेही त्यांनी सांगितले.सध्याच्या या आपत्तीजन्य परिस्थितीत कोणतेही राजकारण न करता सर्वांनी एकत्र काम करणे गरजेचे असतानाही पालकमंत्री सामंत यांनी माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे, आमदार नीतेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच जिल्ह्यातील इतर आजी-माजी मंत्री, लोकप्रतिनिधी यांना एकदाही विश्वासात घेतले नाही. तसेच कोरोना संदर्भातील सभेचे निमंत्रण न देता या सर्वांना डावलण्याचा प्रकार करून या आपत्तीजन्य परिस्थितीतही ते पक्षीय राजकारण करीत आहेत. हे सर्व चुकीचे आहे.कोरोनामुळे जिल्ह्यात उद्भवणाऱ्या परिस्थितीवर मात करण्यासाठी व सत्ताधाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी भाजपाच्यावतीने माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील ३३ व्यक्तींची कोविड आपत्ती जिल्हा नियंत्रण समिती स्थापन करण्यात आली.

यामध्ये सल्लागार म्हणून माजी मंत्री सुरेश प्रभू, आमदार रवींद्र चव्हाण, समन्वयक तेली, सहसमन्वयक समिधा नाईक, कार्यकारिणी सदस्य माजी खासदार निलेश राणे, नीतेश राणे, माजी आमदार अजित गोगटे, प्रमोद जठार, अतुल काळसेकर तसेच इतर आजी-माजी पदाधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. आगामी दोन ते तीन दिवसांत समितीची कार्यप्रणाली जाहीर केली जाणार आहे, असेही यावेळी राजन तेली यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarayan Raneनारायण राणे sindhudurgसिंधुदुर्गBJPभाजपा