सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात लॉकडाऊनच्या काळात म्हणजेत २३ मार्चपासून आजपर्यंत अवैध दारू वाहतूक करणाऱ्या १०६ व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे. तर या प्रकरणी आतापर्यंत ९१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यांमध्ये एकूण १ कोटी ७८ लाख ३१ हजार ८३६ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली आहे.जिल्ह्यामध्ये २३ मार्चपासून कलम १४४ अंतर्गत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तेव्हापासून जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यामध्ये १७ लाख ८७ हजार ६३२ रुपये किमतीचा मुद्देमाल व १ कोटी २८ लाख १० हजार २०४ रुपये किमतीची अवैध वाहतूक करणारी वाहने जप्त करण्यात आली आहेत.बांदा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये १९ मे रोजी पत्रादेवी तपासणी नाक्यावर वाहन तपासणी सुरू असताना गुजरात राज्यात माल वाहतुकीसाठी जाणाऱ्या वाहनातून गोवा बनावटीच्या दारुची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तत्काळ कारवाई करून २० लाख ३४ हजार रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू व १ लाख २० हजार रुपये किमतीचा माल वाहतुकीचा कँटर जप्त करण्यात आल्याचेही पोलीस अधीक्षक दीक्षित गेडम यांनी सांगितले.
CoronaVirus Lockdown : अवैध मद्य वाहतूक करणाऱ्या १०६ जणांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 18:02 IST
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात लॉकडाऊनच्या काळात म्हणजेत २३ मार्चपासून आजपर्यंत अवैध दारू वाहतूक करणाऱ्या १०६ व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे. ...
CoronaVirus Lockdown : अवैध मद्य वाहतूक करणाऱ्या १०६ जणांवर कारवाई
ठळक मुद्देअवैध मद्य वाहतूक करणाऱ्या १०६ जणांवर कारवाई९१ गुन्हे दाखल, पावणे दोन कोटींचा मुद्देमाल जप्त : दीक्षित गेडाम