CoronaVirus : कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ, परिसर कंटेन्मेंट झोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 15:12 IST2020-06-10T15:11:16+5:302020-06-10T15:12:34+5:30

सावंतवाडी तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २१ वर पोहोचली असून, मळेवाडमध्ये दोन कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने खळबळ माजली आहे. दरम्यान, प्रशासनाने माळकर टेंब कंटेन्मेंट झोन केला असून, या तरुणाच्या सोबतच्या व्यक्तीचा शोध प्रशासन घेत असल्याचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी सांगितले. या दोन्ही व्यक्ती पहिल्या रुग्णाच्या संपर्कातील आहेत.

CoronaVirus: Increase in corona patients, premises containment zone | CoronaVirus : कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ, परिसर कंटेन्मेंट झोन

CoronaVirus : कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ, परिसर कंटेन्मेंट झोन

ठळक मुद्देकोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ, परिसर कंटेन्मेंट झोन मळेवाडमध्ये आढळले दोन कोरोनाबाधित

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २१ वर पोहोचली असून, मळेवाडमध्ये दोन कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने खळबळ माजली आहे. दरम्यान, प्रशासनाने माळकर टेंब कंटेन्मेंट झोन केला असून, या तरुणाच्या सोबतच्या व्यक्तीचा शोध प्रशासन घेत असल्याचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी सांगितले. या दोन्ही व्यक्ती पहिल्या रुग्णाच्या संपर्कातील आहेत.

हा तरुण कोरोना बाधित म्हणून पुढे आल्यानंतर प्रशासनाने खबरदारी म्हणून ज्या शाळेत क्वारंटाईन केले होते त्या शाळेला कंटेन्मेंट झोन केले आहे. तसेच या तरुणासोबत असलेल्या युवकांची नावे प्रशासन घेत असून, त्यांचेही स्वॅब घेण्यात येणार आहेत, असे तहसीलदार म्हात्रे यांनी सांगितले.

सध्या जिल्ह्यात रेड झोनमधून मोठ्या प्रमाणात चाकरमानी आले आहेत तर काही अजूनही येत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच स्तरावर काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून वेळोवेळी करण्यात येत आहे. तसेच सर्व नियम पाळणेही तितकेच गांभीर्याचे झाले आहे.

दुसरा रुग्ण पहिल्या रुग्णाच्या संपर्कातील

सावंतवाडी तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून, हा आकडा सोमवारी २१ वर पोहोचला आहे. सोमवारी नव्याने मळेवाड येथील तरुण कोरोना बाधित मिळाला आहे. हा तरुण २ जून रोजी मुंबईतून आला होता. त्याला आल्यापासूनच थोडीशी लक्षणे दिसत असल्याने त्याची तपासणी करण्यात आली होती. तसेच त्याला शाळेत क्वारंटाईन करून ठेवले होते. मात्र यात तो कोरोना बाधित असल्याचे पुढे आले आहे. दरम्यान, दुसरा रूग्णही पहिल्या रूग्णाच्या संपर्कातील असल्याने त्याचा अहवाल ही कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

Web Title: CoronaVirus: Increase in corona patients, premises containment zone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.