CoronaVirus in Sindhudurg: सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा प्रवेश; पहिला रुग्ण सापडला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 07:42 PM2020-03-26T19:42:51+5:302020-03-26T19:51:35+5:30

CoronaVirus: मंगलोर एक्स्प्रेसमधून प्रवास केलेल्या एकाला कोरोनाची लागण

CoronaVirus first patient found in sindhudurg kkg | CoronaVirus in Sindhudurg: सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा प्रवेश; पहिला रुग्ण सापडला

CoronaVirus in Sindhudurg: सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा प्रवेश; पहिला रुग्ण सापडला

Next

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गमधील कणकवलीत कोरोनाचा रुग्ण सापडला आहे. १९ मार्चला मंगलोर एक्स्प्रेसने प्रवास करत असताना कर्नाटकमधील कोरोना बाधित रुग्णांशी संपर्क आल्याने कोरोना बाधित झाल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे. त्याला जिल्हा रुग्णालयामध्ये विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्याची माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यानं १९ मार्चला आलेल्या मंगलोर एक्सप्रेसने केला होता. कोकण रेल्वेच्या प्रशासनाने जिल्हा प्रशासनाला याबद्दलची माहिती दिली होती. यानंतर जिल्हा प्रशासनाने कणकवली रेल्वे स्टेशनवर तपासणी केली. तपासणीनंतर त्या सर्व प्रवाशांना होम क्वॉरेंनटाईनच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

जिल्हा प्रशासनाने मंगलोर एक्सप्रेसमधील प्रवास केलेल्या सर्व प्रवाशांची माहिती घेऊन त्यांच्याशी साधला होता. त्यावेळी एका रेल्वे प्रवाशाच्या आईला खोकला असल्यानं तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली. आईला रुग्णालयात दाखल केल्यानंतर दुसऱ्या दिवशी रेल्वेतून प्रवास केलेल्या तिच्या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

आई आणि मुलाचे रिपोर्ट तपासणीसाठी पुण्यात पाठवण्यात आले होते. हे रिपोर्ट आज मिळाले. त्यातून मुलाला कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आले. तर आईसह इतर चार जणांचे पाठविलेले रिपोर्ट निगेटिव्ह आले. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. त्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण होम क्वॉरेंटाईन असल्यामुळे इतर कोणाच्या आलेला नाही. मात्र प्रवास करताना त्याच्या सोबत आलेली त्याची बहिण २१ मार्चला मुंबईला गेली. याबद्दलची माहिती जिल्हा प्रशासनाने तातडीने मुंबईच्या यंत्रणेला दिली. मुंबईत तिला तपासणीसाठी ताब्यात घेतलं जाणार आहे.

Web Title: CoronaVirus first patient found in sindhudurg kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.