कणकवलीत वाढदिवस सोहळ्यात कोरोना योद्धयांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 06:51 PM2021-07-14T18:51:18+5:302021-07-14T18:53:03+5:30

CoronaVirus Kankavli Sindhudurg : संदेश पारकर यांना समाजाबद्दल आंतरिक तळमळ आहे. त्यामुळे ते जनतेवरील अन्यायाच्या विरोधात नेहमीच संघर्ष करतात. त्यांच्या कार्यकर्तृत्वाला वाव मिळण्यासाठी त्यांना मानाचे पद मिळाले पाहिजे. ही आमची सर्वांची इच्छा आहे.त्यामुळे त्यांनी संयम ठेवावा,त्यांना शिवसेनेत निश्चितच न्याय मिळेल,असा विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.

Corona warriors felicitated at a birthday party in Kankavali | कणकवलीत वाढदिवस सोहळ्यात कोरोना योद्धयांचा सत्कार

 कणकवली येथील मातोश्री मंगल कार्यालयात शिवसेनेच्यावतीने कोरोना योद्धयांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी वैभव नाईक, संदेश पारकर आदी उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देसंदेश पारकर यांना शिवसेनेत निश्चित न्याय मिळेल : उदय सामंतमान्यवरांनी दिल्या शुभेच्छा

कणकवली : संदेश पारकर यांना समाजाबद्दल आंतरिक तळमळ आहे. त्यामुळे ते जनतेवरील अन्यायाच्या विरोधात नेहमीच संघर्ष करतात. त्यांच्या कार्यकर्तृत्वाला वाव मिळण्यासाठी त्यांना मानाचे पद मिळाले पाहिजे. ही आमची सर्वांची इच्छा आहे.त्यामुळे त्यांनी संयम ठेवावा,त्यांना शिवसेनेत निश्चितच न्याय मिळेल,असा विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.

कणकवली येथील मातोश्री मंगल कार्यालयात बुधवारी शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने कोरोना योध्याचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.

यावेळी आमदार वैभव नाईक,जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत,शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते,जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर,राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत,नीलम पालव,राजू शेट्ये,बाळा भिसे, गीतेश कडू,शैलेश भोगले,प्रथमेश सावंत, राजलक्ष्मी डिचोलकर,स्वरूपा विखाळे,संजय आंग्रे,विकास कुडाळकर,संतोष शिरसाठ,अनंत पिळणकर,नगरसेवक सुशांत नाईक,कन्हैया पारकर,विलास साळसकर,अवधूत मालणकर,संदेश सावंत- पटेल,अतुल बंगे, राजू राठोड,हर्षद गावडे,विलास कोरगावकर, संतोष पुजारे आदींसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंत्री उदय सामंत म्हणाले, शिवसेनेत आल्यानंतर संदेश पारकर यांना पक्षात योग्य तो मान, सन्मान देण्यात येत आहे. त्यामुळे पारकर यांनी आता आहे तिथेच रहावे. भविष्यात त्यांना चांगले पद मिळवून देण्यासाठी मी स्वतः मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरवठा करेन.

पारकर यांच्याकडे पद असो वा नसो ते अविरतपणे सामाजिक कार्य करत राहतात. आजपर्यंत ते ज्या-ज्या पक्षात गेले तेथे त्यांनी प्रामाणिकपणे काम केले म्हणून त्यांची राज्यभर आदर्श नेते म्हणून ओळख आहे. त्यांनी हाती घेतलेले समाजसेवेचे व्रत अविरतपणे सुरू ठेवावे. आमदार वैभव नाईक म्हणाले, संदेश पारकर यांच्याबद्दल जनतेच्या हृदयात आणि मनात आदराचे स्थान आहे. हीच त्यांच्या कामाची पोचपावती आहे.

अरुण दुधवडकर म्हणाले, राजकीय दहशतीच्या विरोधात लढणारे संदेश पारकर हे आहेत. राजकीय वाटचालीमध्ये त्यांनी काही चुकीने निर्णय घेतले. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले. पण आता शिवसेनेत आल्यानंतर त्यांना पक्षात योग्य मान, सन्मान मिळत असून भविष्यात त्यांना चांगल्या पदाची जबाबदारी सोपवली जाईल. यावेळी कोरोना काळात अविरत सेवेबद्दल डॉक्टर, परिचारिका, आशा स्वयंसेविका, वायरमन, पोलिस कर्मचारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पत्रकार यांचा कोरोना योद्धा म्हणून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
 

Web Title: Corona warriors felicitated at a birthday party in Kankavali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.