corona Virus in Sindhudurg : यावर्षीही जैतिर उत्सवावर कोरोनाचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 16:15 IST2021-06-07T16:14:10+5:302021-06-07T16:15:27+5:30
CoronaVirus In Sindhudurg : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुळसचे ग्रामदेवता श्री देव जैतीराचा उत्सव यावर्षी साजरा न करता अत्यंत साध्या पद्धतीने फक्त मानकरी व पुजारी यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी उरकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

corona Virus in Sindhudurg : यावर्षीही जैतिर उत्सवावर कोरोनाचे सावट
वेंगुर्ला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुळसचे ग्रामदेवता श्री देव जैतीराचा उत्सव यावर्षी साजरा न करता अत्यंत साध्या पद्धतीने फक्त मानकरी व पुजारी यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी उरकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आपल्या जिल्ह्याची रेड झोनकडून ग्रीन झोनकडे वाटचाल सुरु असली तरी वेंगुर्ला तालुक्यातील ग्रामिण भागातील मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता निर्णय घेण्यात आला आहे. तुळस देवस्थानचे मानकरी व देवस्थान समिती यांची संयुक्त बैठक पार पडली.
या बैठकीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने शासनाच्या व प्रशासनाच्या नियम व अटींना अधिन राहून अत्यंत साध्या पद्धतीने फक्त धार्मिक विधी उरकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गतवर्षी याच धर्तीवर धार्मिक विधी पार पडले होते. त्यामुळे बाहेरील व गावातीलही भाविकांना मंदिर परिसरात प्रवेश नाकारण्यात आला होता. यावर्षीही भाविकांनी आहात तिथूनच हात जोडून देवाचे स्मरण करावे व मानकरी व देवस्थान समितीस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.