शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

Corona virus In Sindhdurg : जिल्हा परिषद स्वनिधीतून सरपंचांना देणार विमा कवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 18:30 IST

सिंधुदुर्ग : कोरोना महामारीत गावपातळीवर राबणाऱ्या सरपंचांना विमा कवच असावे, ही मागणी राज्य सरकार पूर्ण करू शकले नाही. मात्र ...

ठळक मुद्देजिल्हा परिषद स्वनिधीतून सरपंचांना देणार विमा कवचउपक्रम राबविणारी राज्यातील पहिली जिल्हा परिषद  : संजना सावंत

सिंधुदुर्ग : कोरोना महामारीत गावपातळीवर राबणाऱ्या सरपंचांना विमा कवच असावे, ही मागणी राज्य सरकार पूर्ण करू शकले नाही. मात्र सिंधुदुर्गजिल्हा परिषदेने जिल्ह्यातील सर्व सरपंचांना आपल्या स्वनिधीतून विमा कवच देण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयाची अंमलबजावणी त्वरित सुरू झाली. प्रशासन व त्यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे हा अभिनव उपक्रम राबविता आला. सरपंचांसाठी असा उपक्रम राबविणारी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद राज्यात पहिली ठरली असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संजना सावंत यांनी दिली.अध्यक्षा संजना सावंत यांनी आपल्या कार्याची छाप अध्यक्षपदाचा कार्यभार घेतल्यापासून दाखविली आहे. कोरोनाचा काळ असतानाही विविध उपक्रम आणि विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सावंत यांनी कामाचा धडाका सुरू ठेवला आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नायर आणि जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने सहकार्य केल्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये चांगले काम करता आले असल्याचेही सावंत म्हणाल्या.

सरपंचांना विमा कवच देण्याच्या निर्णयातही प्रशासनाने जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या या निर्णयात एकमुखी साथ दिल्यामुळे जिल्ह्यातील ४२८ सरपंचांना एक लाखाचे विमा संरक्षण कोरोनाच्या साथीत मिळणार आहे. जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, प्रशासनातील अधिकारी, जिल्ह्यातील नागरिकांसाठी, सरपंच व अन्य लोकप्रतिनिधींसाठी ही जिल्हा परिषद विविध प्रश्नांवर चांगले काम करील, असे अध्यक्षा संजना सावंत यांनी सांगितले.

जिल्ह्यातील १५ प्रातिनिधिक सरपंचांना निमंत्रित करून त्यांना ही विमा पॉलिसी बहाल करण्यात आली. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नायर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपाली पाटील, सभापती अंकुश जाधव, शर्वानी गावकर, डॉ. अनिशा दळवी, सावी लोके आदी उपस्थित होते.प्रातिनिधिक स्वरूपात पॉलिसीचे वितरणयावेळी सरपंच नागेश अहिर, गुरुप्रसाद वायंगणकर, संजय सावंत, विठ्ठल तेली, विनोद सुके, अक्रम खान, तुकाराम साहिल, वैदही गुरव सरपंच, राजाराम जाधव, नारायण मांजरेकर, विश्राम सावंत, मंगेश तळगावकर, महादेव धुरी, शंकर घारे, मनोज उगवेकर, नागेश परब, इत्यादी सरपंच उपस्थित होते. प्रातिनिधिक स्वरूपात पॉलिसीचे वितरण करण्यात आले.प्रातिनिधिक स्वरूपात पॉलिसीचे वितरणयावेळी सरपंच नागेश अहिर, गुरुप्रसाद वायंगणकर, संजय सावंत, विठ्ठल तेली, विनोद सुके, अक्रम खान, तुकाराम साहिल, वैदही गुरव सरपंच, राजाराम जाधव, नारायण मांजरेकर, विश्राम सावंत, मंगेश तळगावकर, महादेव धुरी, शंकर घारे, मनोज उगवेकर, नागेश परब, इत्यादी सरपंच उपस्थित होते. प्रातिनिधिक स्वरूपात पॉलिसीचे वितरण करण्यात आले. 

टॅग्स :zpजिल्हा परिषदsindhudurgसिंधुदुर्गsarpanchसरपंच