corona virus -वर्दळीच्या बसस्थानकात फक्त एसटी बसेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 17:17 IST2020-03-23T17:15:21+5:302020-03-23T17:17:19+5:30
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये, सावंतवाडीत नागरिकांनी घरातून बाहेर पडण्याचे टाळले. तसेच एकही वाहन रस्त्यावर फिरताना दिसत नव्हते. बसस्थानकावर तर प्रवाशांविना सर्व एसटी बस उभ्या दिसत होत्या. पोलिसांनीही गाडीला स्पीकर लावून घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन नागरिकांना केले. तसेच पोलीस गाडीतून पेट्रोलिंग करताना दिसत होते.

सावंतवाडी एसटी बस स्थानकावर प्रवाशाविना फक्त बसेस उभ्या होत्या.
सावंतवाडी : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये, सावंतवाडीत नागरिकांनी घरातून बाहेर पडण्याचे टाळले. तसेच एकही वाहन रस्त्यावर फिरताना दिसत नव्हते. बसस्थानकावर तर प्रवाशांविना सर्व एसटी बस उभ्या दिसत होत्या. पोलिसांनीही गाडीला स्पीकर लावून घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन नागरिकांना केले. तसेच पोलीस गाडीतून पेट्रोलिंग करताना दिसत होते.
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सरकार सर्व पातळीवर उपाययोजना करताना दिसत आहे. सावंतवाडीतही सकाळपासूनच रस्त्यारस्त्यांवर शुकशुकाट दिसत होता. नेहमीच लगबगी असणारी ठिकाणे पूर्णत: शांत होती. सावंतवाडीत व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद ठेवला होता. त्याला आणखी प्रतिसाद मिळाला.
येथील बसस्थानकावर एकही प्रवासी दिसत नव्हता. सर्व एसटी बसेस उभ्या होत्या. शहरातील रिक्षा बंद ठेवण्यात आल्या होत्या. तसेच पोलीस अधूनमधून पोलीस व्हॅन फिरवून जनतेला घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन करत होते.
पोलिसांच्याही आवाहनाला नागरिक चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत होते. रस्त्यावर एकही वाहन फिरताना दिसत नव्हते. त्यामुळे जनता कर्फ्यू यशस्वी झाले असेच दिसत होते. जनतेने घरातच बसणे पसंत केल्याने पोलिसांचीही डोकेदुखी कमी झाली होती.
त्यामुळे सावंतवाडी शहरात नाक्यानाक्यावर दिसणारे पोलीसही दिसत नव्हते. मात्र, पोलिसांची एक व्हॅन शहरातून पेट्रोलिंग करत होती. एखादा नागरिक किंवा एखादे वाहन रस्त्यातून फिरताना दिसले तरी पोलीस त्यांची चौकशी करताना दिसत होते.