शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : मातेचे शेवटचे दर्शनही घेता आले नाही, कोरोना विषाणूची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 15:00 IST

सोनु कुबल यांचे मातृछत्र हरपले. मात्र, मातेचे शेवटचे दर्शन घेण्याचे भाग्य त्यांच्या नशिबी लाभले नाही. ते क्वारंंटाईन असल्यामुळेच.

ठळक मुद्देमातेचे शेवटचे दर्शनही घेता आले नाही, कोरोना विषाणूची दहशतभेडशी येथील सोनु कुबल यांची व्यथा; पुणे येथून आल्याने क्वारंटाईन

दोडामार्ग : सध्या कोरोना विषाणूची दहशत इतकी निर्माण झाली आहे की, आपल्या जन्मदात्रीचे अंतिम दर्शन घेणेसुद्धा कठीण झाले आहे. या विषाणूच्या फैलावामुळे क्वारंंटाईन असलेल्या व्यक्तींच्या घरात कोणी मृत झाले तर त्याचे लांबूनही दर्शन घेण्यास दिले जात नाही. असाच प्रसंग कुबल कुटुंबीयांवर ओढवला. सोनु कुबल यांचे मातृछत्र हरपले. मात्र, मातेचे शेवटचे दर्शन घेण्याचे भाग्य त्यांच्या नशिबी लाभले नाही. ते क्वारंंटाईन असल्यामुळेच.कुबल कुटुंबीय हे मूळ पाल गावचे. मात्र, तिलारी प्रकल्प बाधित असल्याने त्यांनी भेडशी येथे घर बांधले. सोनु कुबल कामानिमित्त पुणे येथे आपल्या कुटुंबासह राहतात. तर त्यांची आई व भाऊ भेडशी येथे राहतात. त्यांच्या भावाचे गतवर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यामुळे त्यांच्या वहिनी व पुतण्या आईसह राहत होते. सोनु कूबल यांची आई रुक्मिणी बाबाजी कुबल हिचे वय १०२ एवढे होते. पूर्ण आयुष्यात त्यांनी कोणतेही डॉक्टरी उपचार घेतले नव्हते. तरीही त्यांनी शंभरी पार केली.गेल्या पंधरा दिवसांपासून त्या अंथरुणाला खिळल्या होत्या. एका मुलाला गतवर्षी देवाज्ञा झाली. तर दुसरे दोन मुलगे कामानिमित्त पुणे येथे राहतात. लॉकडाऊनमुळे ते तेथेच अडकले. कदाचित अन्नपाणी न घेता पंधरा दिवस ही माऊली मुलांचीच वाट पाहत होती. परंतु नियतीला ते मंजूर नसावे! पुत्र गावी येऊनही त्यांना मातेचे व मातेला पुत्रांचे शेवटचे दर्शन झालेच नाही.सोनु कुबल यांना आपली आई अंथरुणाला खिळली असल्याचे समजताच त्यांनी गावी येण्याचा निर्णय घेतला. मात्र, कोरोना प्रादुर्भावामुळे शासनाने घातलेल्या नियम व अटींचे पूर्ण पालन करून येणे त्यांना ग्राह्य होते. शासकीय निकषानुसार त्यांनी ई-पासद्वारे भेडशी गाव गाठले.मात्र, घरी जाऊन मातेचे शेवटचे दर्शन घेण्यास अडथळा आला तो संस्थात्मक क्वारंंटाईनचा. कोरोनाची झपाट्याने वाढ होत असलेल्या पुणे शहरातून ते दोघे आल्याने ग्रामस्थांनी त्यांना घरी जाण्यास विरोध केला. तो फक्त कोरोना या संसर्गजन्य रोगामुळे. कारण या रोगाची भयानकता संपूर्ण जगाला हादरून गेली आहे.शासन नियमानुसार त्यांना घरी जाण्याअगोदर क्वारंंटाईन होणे भाग पडले. क्वारंंटाईन होऊन दोन दिवस झाले आणि जन्मदात्रीने घरी प्राण सोडला. कोण जाणे आपल्या पुत्रांंची शेवटची भेट होईल याची ती माऊली वाट पाहत होती. मात्र, माय-लेकरांची भेट झालीच नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकsindhudurgसिंधुदुर्ग