शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : कुडाळ आगारप्रमुख धारेवर, काँग्रेस पदाधिकारी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 12:04 IST

CoronaVirusUnlock, Kudal, StateTransport, Congress, Sindhudurgnews क्वारंटाईन वाहक-चालकांची जबाबदारी एसटी प्रशासन का टाळते? त्यांची जबाबदारी हे तुमचे कर्तव्य आहे की नाही? कर्तव्य बजावणाऱ्या सेवा देणाऱ्या वाहक-चालकांना आरोग्यविषयक सेवा सुविधा का उपलब्ध करून दिल्या नाहीत? असे सवाल कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी विचारत कुडाळ एसटी आगारप्रमुख सुजित डोंगरे यांना धारेवर धरले.

ठळक मुद्देकुडाळ आगारप्रमुख धारेवर, काँग्रेस पदाधिकारी आक्रमक कोरोना तपासणीबाबत दुर्लक्ष

कुडाळ : क्वारंटाईन वाहक-चालकांची जबाबदारी एसटी प्रशासन का टाळते? त्यांची जबाबदारी हे तुमचे कर्तव्य आहे की नाही? कर्तव्य बजावणाऱ्या सेवा देणाऱ्या वाहक-चालकांना आरोग्यविषयक सेवा सुविधा का उपलब्ध करून दिल्या नाहीत? असे सवाल कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी विचारत कुडाळएसटी आगारप्रमुख सुजित डोंगरे यांना धारेवर धरले.कुडाळ आजारातून मुंबई येथे बससेवा देण्यासाठी जाणाऱ्या कुडाळ तालुक्यातील चालक-वाहकांच्या कोरोना तपासणीबाबत कुडाळ एसटी प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या दुर्लक्षाबाबत कुडाळ तालुका काँग्रेसच्यावतीने आगारप्रमुख कार्यालयात धडक दिली.यावेळी काँग्रेसचे कुडाळ तालुकाध्यक्ष आबा मुंज, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष विजय प्रभू, माजी महिला काँग्रेस जिल्हा प्रेसिडेंट नीता राणे, भाजपाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य निलेश तेंडुलकर, तेंडोली सरपंच मंगेश प्रभू, कुडाळ तालुका सेक्रेटरी पांडू खोचरे, युवक काँग्रेसचे कुडाळ मालवण विधानसभा अध्यक्ष मंदार शिरसाट, युवक काँग्रेसचे कुडाळ शहर अध्यक्ष चिन्मय बांदेकर, युवक काँग्रेस कुडाळ तालुकाध्यक्ष म्हाडदळकर, सुंदर सावंत, उल्हास शिरसाट, तब्रेज मुजावर, तेंडोली ग्रामपंचायत सदस्य गुरुनाथ उर्फ गोट्या मेस्त्री, विनोद प्रभू आदी उपस्थितहोते.यावेळी तेंडोली सरपंच मंगेश प्रभू यांनी सांगितले की, परजिल्ह्यात, मुंबई येथे सेवा बजावणाऱ्या जिल्ह्यातील चालक-वाहकांची कोरोना चाचणी योग्यप्रकारे झाली नाही. याचे कारण आपल्या आगारातील एक व्यक्ती कोरोना बाधित असतानाही त्याचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आहे अशा प्रकारचा मेसेज आपण पाठविलात.

त्यामुळे ती बाधित व्यक्ती गावात सर्वत्र फिरली. त्यामुळे आता भविष्यात त्या गावात कोरोनाचे रुग्ण वाढल्यास त्याला जबाबदार कोण? असा सवाल विचारत चुकीच्या पद्धतीने अहवाल देऊ नका. जाहीर करू नका असा सल्ला त्यांनी दिला.यापुढे योग्य ती दक्षता घेतली जाईल : डोंगरेविजय प्रभू व निलेश तेंडुलकर यांनी सांगितले की, कुडाळ आगारातून मुंबई येथे गेलेल्या प्रत्येक चालक-वाहकाची योग्य प्रकारे कोरोना तपासणी करण्यात यावी. त्यांना चांगल्या सोयी सुविधा द्याव्यात.यावेळी डोंगरे म्हणाले की, मुंबई येथे जाणाऱ्या कुडाळ आगारातील चालक व वाहक यांच्या कोरोना तपासणीबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी चर्चा केली आहे. यापुढे योग्य ती दक्षता घेतली जाईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. 

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकstate transportएसटीcongressकाँग्रेसsindhudurgसिंधुदुर्गkudal-acकुडाळ