corona in sindhudurg : मालाडहुन आलेल्या क्वारंटाईन युवकाचा अचानक मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 13:08 IST2020-05-27T13:06:58+5:302020-05-27T13:08:39+5:30

मालाडहून सावंतवाडी गुळदुवे येथे आलेल्या युवकाचा अचानक मृत्यू झाला आहे. मालाडहून भाड्याची गाडी करून हा युवक मंगळवारी गावी आला होता.

corona in sindhudurg- Sudden death of a quarantine youth from Malad | corona in sindhudurg : मालाडहुन आलेल्या क्वारंटाईन युवकाचा अचानक मृत्यू

corona in sindhudurg : मालाडहुन आलेल्या क्वारंटाईन युवकाचा अचानक मृत्यू

ठळक मुद्देमालाडहुन आलेल्या क्वारंटाईन युवकाचा अचानक मृत्यूगुळदवे शाळेत होता क्वारंटाईन, मृत्यू कशामुळे झाला हे अस्पष्ट

सावंतवाडी : मालाडहून सावंतवाडी गुळदुवे येथे आलेल्या युवकाचा अचानक मृत्यू झाला आहे. मालाडहून भाड्याची गाडी करून हा युवक मंगळवारी गावी आला होता.

मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करून त्याला गुळदुवे येथील शाळेत क्वारंटाईन करण्यात आले होते. त्याच्या बरोबर त्याची पत्नी व मुलगा आली आहेत. रात्री अचानक मृत युवकाला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने उपचारासाठी शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते.

यावेळी त्याचा वाटेतच झाला. नेमका मृत्यू कशामुळे झाला हे अजून स्पष्ट झाले नाही. मृत व्यक्तिचा स्वॅब नमुना घेऊन त्याचा रिपोर्ट आल्यावर स्पष्ट होणार आहे.

मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात या युवकाची तपासणी केल्याने हे आरोग्य केंद्रही बुधवारी बंद ठेवण्यात येणार आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.ठाकूर यांना सूचना दिल्या सूचना आहेत.

अशी माहिती डॉ. ठाकूर यांनी दिली. बुधवारी आरोग्य केंद्रात कोणाचीही तपासणी होणार नाही असे डॉ. ठाकूर यांनी स्पष्ट केले.

Web Title: corona in sindhudurg- Sudden death of a quarantine youth from Malad