corona in sindhudurg-एक मूठ धान्य गरिबांसाठी उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 17:34 IST2020-04-10T17:33:24+5:302020-04-10T17:34:19+5:30
बांदा शहर भाजपच्यावतीने रास्त दराच्या धान्य दुकानामध्ये मिळालेल्या धान्यातून एक मूठ धान्य गरिबांसाठी हा उपक्रम राबविण्यात आला.

एक मूठ धान्य स्वखुशीने गरिबांसाठी दान करावे या भाजपाच्या उपक्रमाला जनतेतून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
बांदा : बांदा शहर भाजपच्यावतीने रास्त दराच्या धान्य दुकानामध्ये मिळालेल्या धान्यातून एक मूठ धान्य गरिबांसाठी हा उपक्रम राबविण्यात आला.
प्रत्येक लाभार्थ्याने रेशन दुकानातून धान्य खरेदी केल्यावर स्वखुशीने एक मूठ धान्य गरिबांसाठी दान करावे, या संकल्पनेला जनतेतून चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक लाभार्थ्यांनी यावेळी आपल्याकडून एक मूठ गहू आणि एक मूठ तांदूळ त्याठिकाणी ठेवलेल्या पोत्यात जमा केले.
जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर, बाळा आकेरकर, बबिता नार्वेकर, श्याम मांजरेकर, विष्णू म्हावळणकर यांनी आपल्या रेशन कार्डवरील सर्व धान्य दान केले. या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
भाजपचे सावंतवाडी सोशल मीडिया प्रमुख बाळा आकेरकर यांच्या संकल्पनेतून उपतालुकाध्यक्ष बाळू सावंत, शक्ती केंद्रप्रमुख मनोज कल्याणकर, बाबा काणेकर, जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर, आबा धारगळकर, केदार कणबर्गी, ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब, ज्ञानेश्वर सावंत, श्याम मांजरेकर, शहर अध्यक्ष राजा सावंत, प्रवीण नाटेकर, बाबल नार्वेकर, मंगल मयेकर, अरुणा सावंत, बबिता नार्वेकर या सर्वांच्या सहभागातून एका अनोख्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.