corona in sindhudurg -सिंधुदुर्गात पुन्हा सापडला चौथा कोरोनाबाधीत रूग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 18:42 IST2020-05-07T18:40:23+5:302020-05-07T18:42:16+5:30
जिल्ह्यात आज आणखी एक कोरोना बाधीत रुग्ण आढळून आला आहे. 27 वर्षाच्या या रुग्णांने मुंबई येथून प्रवास केला आहे. कुडाळ तालुक्यातील जांभवडे गावातील हा रुग्ण दिनांक 28 एप्रिल 2020 रोजी मुंबईतील परळ येथून जिल्ह्यात दाखल झाला होता. त्यानंतर त्याला कुडाळ येथील संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले होते.

corona in sindhudurg -सिंधुदुर्गात पुन्हा सापडला चौथा कोरोनाबाधीत रूग्ण
सिंधुदुर्ग : जिल्ह्यात आज आणखी एक कोरोना बाधीत रुग्ण आढळून आला आहे. 27 वर्षाच्या या रुग्णांने मुंबई येथून प्रवास केला आहे. कुडाळ तालुक्यातील जांभवडे गावातील हा रुग्ण दिनांक 28 एप्रिल 2020 रोजी मुंबईतील परळ येथून जिल्ह्यात दाखल झाला होता. त्यानंतर त्याला कुडाळ येथील संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले होते.
बाधीत क्षेत्रातून आला असल्याने 5 मे 2020 रोजी त्याचा स्वॅब तपासणीसाठी पाठवला होता. त्याचा अहवाल आज आला असून त्यास कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
सध्या हा रुग्ण जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये दाखल आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 4 झाली असून त्यापैकी 1 रुग्ण बरा होऊन घरी परतला आहे. तर 3 रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल असून त्यांच्यावर औषधोपचार सुरू आहेत.