corona in sindhudurg-जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी १५ जणांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 19:54 IST2020-03-26T19:54:00+5:302020-03-26T19:54:40+5:30
जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गिर्ये येथील १३ जणांविरूध्द कारवाई करण्यात आली.

corona in sindhudurg-जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी १५ जणांवर कारवाई
ठळक मुद्देजमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी १५ जणांवर कारवाईकलम १८८ प्रमाणे गुन्हे दाखल
देवगड : जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गिर्ये येथील १३ जणांविरूध्द कारवाई करण्यात आली.
गिर्ये येथील काही नागरिक पाचपेक्षा जास्त ग्रुप करून फिरत होते. विजयदुर्ग पोलिसांनी यातील १३ जणांविरूध्द जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी कारवाई केली असून गुन्हे दाखल केले असल्याचे पोलीस निरीक्षक संतोष कोळी यांनी सांगितले.
देवगड पोलिसांनीही बुधवारी देवगड-जामसंडे भागात संचारबंदीच्या काळात विनाकारण फिरणाऱ्या दोघांविरूद्ध कारवाई केली आहे. जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांच्या मनाई आदेशाचा भंग केला म्हणून दोघांविरूद्ध भादवि कलम १८८ प्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत.