कणकवली : शहरातील जिल्हा परिषदेची शाळा क्रमांक ३ मधील एक शिक्षक कोरोना बाधित आढळून आल्याने ही शाळा सात दिवस बंद ठेवण्याचा निर्णय शाळा प्रशासनाने घेतला आहे.तसेच या शिक्षकांच्या संपर्कात असणाऱ्या अन्य शिक्षकांचे ही स्वॅब तपासणीसाठी पाठवले असून त्यांचा अहवाल येणे बाकी आहे. या शाळेतील शिक्षक पॉझिटिव्ह मिळाल्याने संबंधित शाळेने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाच्या पुढील काळात शाळा सुरू ठेवण्यासाठी शिक्षकांनी व पालक समितीने पुढे येऊन खबरदारी घेतल्यास शाळा सुरु राहू शकतात. मागील दोन वर्ष मुलांचे जे नुकसान झाले ते नुकसान न होण्यासाठी शाळा प्रशासन प्रयत्न करू शकतात. त्यामुळे शासनाच्या नियमांचे पालन करून शाळा सुरू राहावी यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे बनले आहे. शाळांबाबत आज निर्णय आज संध्याकाळपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिली ते नववी व अकरावीचे वर्ग बंद ठेवण्याबाबत व शाळा बंद करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती शिक्षक विभागाच्या सूत्रांनी दिली.
कणकवलीतील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह; शाळा सात दिवस बंद ठेवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2022 13:29 IST