यात्रोत्सवाला कोरोनाचा फटका :स्थानिकांनाच दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 16:29 IST2021-03-12T16:27:32+5:302021-03-12T16:29:57+5:30
Kunkewar Religious Places sindhudurg -यावर्षी कोरोनामुळे श्री देव कुणकेश्वर महाशिवरात्रोत्सव केवळ धार्मिक विधी व मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. दरवर्षी लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणारा यात्रोत्सव यावर्षी मात्र कोरोनामुळे ग्रामस्तरावर सुरू झाल्याने कुणकेश्वर परिसर सुनासुना दिसत होता.

श्री देव कुणकेश्वर महाशिवरात्रोत्सव केवळ धार्मिक विधी व मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. दरवर्षी लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणारा हा यात्रोत्सव यावर्षी मात्र कोरोनामुळे ग्रामस्तरावर सुरू झाल्याने कुणकेश्वर परिसर सुनासुना दिसत होता.(छाया: वैभव केळकर)
देवगड : यावर्षी कोरोनामुळे श्री देव कुणकेश्वर महाशिवरात्रोत्सव केवळ धार्मिक विधी व मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. दरवर्षी लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणारा यात्रोत्सव यावर्षी मात्र कोरोनामुळे ग्रामस्तरावर सुरू झाल्याने कुणकेश्वर परिसर सुनासुना दिसत होता.
कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रोत्सवाला गुरुवारपासून सुरुवात झाली. गुरुवारी पहाटे २ वाजल्यापासून दर्शनाला सुरुवात झाली. स्थानिक पुजारी, देवस्थानचे देवसेवक, विश्वस्त आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत विधिवत पूजा झाल्यानंतर दर्शनाला सुरुवातझाली.
बाहेरून येणाऱ्या भाविक भक्तांना, पाहुणे मंडळींना, भजनी मंडळींना, वारकरी सांप्रदायिक मंडळे, रथयात्रींना, यात्रेकरूंना, पर्यटकांना, व्यापारी वर्गाला ११ ते १३ मार्च या कालावधीत कुणकेश्वर महाशिवरात्री उत्सवात सहभागी होता येणार नाही, असे आवाहन करण्यात आले होते. ग्रामस्तरावर साध्या पद्धतीने यात्रा असल्याने कुणकेश्वरकडे जाणाऱ्या सर्व मार्गांवर नाकाबंदी करण्यात आली होती. त्यामुळ सर्वच परिसर काहीसा सुनासुना वाटत होता.
११ ते १३ मार्च या यात्रोत्सवाच्या तीन दिवसांच्या कालावधीत कुणकेश्वरमध्ये जाण्यासाठी व कुणकेश्वरमधून बाहेर येण्यासाठी स्थानिक नागरिकांनाही पोलीस यंत्रणेला आधारकार्ड दाखवावे लागत होते. खाकशीमार्गे कुणकेश्वर, तारामुंबरी मिठमुंबरीमार्गे कुणकेश्वर, मिठबांव कातवणमार्गे कुणकेश्वर या तिन्ही मार्गांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बॅरिकेट्स लावून नाकाबंदी करण्यात आली होती.
समुद्रकिनारा सुना सुना
दरवर्षी यात्रेच्या निमित्ताने गजबजलेला कुणकेश्वर समुद्रकिनाराही यावर्षी सुना सुना होता. कुणकेश्वर यात्रोत्सवासाठी २०२ पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये २ डीवायएसपी, २० पोलीस अधिकारी, ८४ अंमलदार, ४८ महिला अंमलदार, २० वाहतूक पोलीस, ३० आरसीपी यांचा समावेश आहे.
जग कोरोनामुक्तीचे साकडे
दरवर्षीप्रमाणे आचरा गावचे ग्रामदैवत श्री रामेश्वर मंदिराकडून कुणकेश्वर चरणी आचरा रामेश्वर देवस्थानचे अभिषेकी निलेश सरजोशी यांनी श्रीफळ अर्पण केले. संपूर्ण जग कोरोनामुक्त करून दरवर्षीप्रमाणे भाविकांच्या उच्चांकी गर्दीत यात्रोत्सव होऊ दे अशी मनोकामना भाविकांनी कुणकेश्वरचरणी व्यक्त केली.
भाविकांसाठी मुखदर्शन
कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करून दर्शन देण्यात येत होते. थर्मल गन, ऑक्सिमीटरद्वारे तपासणी, सॅनिटायझेशन व सोशल डिस्टन्स अशाप्रकारे भाविकांना दर्शन देण्यात येत होते. कुणकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश न देता भाविकांना केवळ मुखदर्शनाची सोय करण्यात आली होती.