शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
5
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
6
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
7
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
8
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
9
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
10
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
11
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
12
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
13
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
14
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
15
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
16
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
17
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
18
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
19
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
20
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार

कोर्ले-सातंडी मध्यम प्रकल्प भरला, दमदार पावसाचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 16:39 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र पाऊस सुरू आहे. गेले चार दिवस सुरू असलेल्या पावसामुळे देवगड तालुक्यातील कोर्ले- सातंडी मध्यम प्रकल्प १०० टक्के भरला असून या प्रकल्पातून ३.५० घनमीटर पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. या प्रकल्पात २५.५६४० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील माडखोल लघु पाटबंधारे प्रकल्पही भरला असून या प्रकल्पात १.६९०० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा झाला आहे. सावंतवाडी तालुक्यातील माडखोल लघु पाटबंधारे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून त्यातून २२.३१ घनमीटर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आंबोली, सनमटेंब व पावशी लघु पाटबंधारे प्रकल्पांमध्ये ६० टक्के पाणीसाठा झाला आहे. ​​​​​​​

ठळक मुद्दे कोर्ले-सातंडी मध्यम प्रकल्प भरला, दमदार पावसाचा परिणामजोर ओसरला, शेतकरी शेतीकामात मग्न

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात सर्वत्र पाऊस सुरू आहे. गेले चार दिवस सुरू असलेल्या पावसामुळे देवगड तालुक्यातील कोर्ले- सातंडी मध्यम प्रकल्प १०० टक्के भरला असून या प्रकल्पातून ३.५० घनमीटर पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. या प्रकल्पात २५.५६४० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा झाला आहे.

जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील माडखोल लघु पाटबंधारे प्रकल्पही भरला असून या प्रकल्पात १.६९०० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा झाला आहे.सावंतवाडी तालुक्यातील माडखोल लघु पाटबंधारे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून त्यातून २२.३१ घनमीटर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आंबोली, सनमटेंब व पावशी लघु पाटबंधारे प्रकल्पांमध्ये ६० टक्के पाणीसाठा झाला आहे.सिंधुदुर्गातील प्रकल्पनिहाय झालेला पाणीसाठा पुढीलप्रमाणे असून सर्व आकडे दशलक्ष घनमीटर परिमाणात आहेत. कंसातील आकडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत.

तिलारी आंतरराज्य प्रकल्प १२६.०२७० (६४.२०), देवघर ३२.६६७० (८९), लघु पाटबंधारे प्रकल्प - शिवडाव -१.०७३६ (१७४), नाधवडे - १.४९१० (१६०), ओटव - १.६०७८ (१६०), देंदोनवाडी - १.००४० (१७४), तरंदळे - ०.२७५० (१६२), आडेली - ०.३८६० (निरंक), आंबोली - १.१२०० (१९५), चोरगेवाडी - ०.९६७० (निरंक), हातेरी -१.११७० (निरंक), निळेली - ०.६७०० (निरंक), ओरोस बुद्रुक - ०.०८०० (निरंक), सनमटेंब - १.४४४० (१५७), तळेवाडी डिगस, - ०.३८०० (निरंक), दाभाचीवाडी - ०.५९१० (निरंक), पावशी - १.८२९० (१७५), शिरवल - ०.६०७० (निरंक), पुळास - ०.४७७० (निरंक), वाफोली - ०.३६६० (निरंक), कारिवडे - ०.२०१० (निरंक). धामापूर - १.१९१० (निरंक), हरकुळ - १.३८४० (७५), ओसरगाव - ०.०७९० (निरंक), ओझरम - ०.३५३० (निरंक), पोईप - १.१६३० (निरंक), शिरगांव - ०.०६१० (१४०), तिथवली - ०.४५७० (१२०), लोरे - १.४१०० (निरंक).सरासरी ९00 मिलीमीटर पावसाची नोंदमागील चार दिवस संततधार कोसळणाऱ्या पावसाने सोमवारी काहीशी विश्रांती घेतली. पावसाच्या अधूनमधून सरी कोसळत होत्या. जिल्ह्यात मागील चोवीस तासात जिल्ह्यात ६९.२५ मिलीमीटर सरासरी पाऊस झाला असून १ जूनपासून आतापर्यंत ८९९.१५ मिलीमीटर सरासरी एकूण पावसाची नोंद झाली आहे.

गेल्या चोवीस तासात तालुकानिहाय झालेला पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी आतापर्यंत झालेल्या एकूण सरासरी पावसाची आहे. सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत.दोडामार्ग ६५ (९४२), सावंतवाडी ७० (६३८), वेंगुर्ले ३७ (१००८.२४), कुडाळ ४० (८१०), मालवण २७ (९३७), कणकवली १४५ (९९०), देवगड ८७ (९२७), वैभववाडी ८३ (९४१) असा पाऊस झाला आहे.

टॅग्स :Damधरणsindhudurgसिंधुदुर्ग