माती उत्खनन, विक्री प्रकरणी ठेकेदार अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 17:16 IST2019-07-25T17:12:49+5:302019-07-25T17:16:21+5:30
बांदा-सटमटवाडी येथे आरटीओ विभागाच्या सीमा तपासणी नाक्याच्या क्षेत्रात बेकायदेशीर माती उत्खनन व विक्री केल्याप्रकरणी संबंधित ठेकेदार कंपनी चांगलीच अडचणीत आली आहे. त्या क्षेत्रात विनापरवाना बेसुमार माती उत्खनन करून तिची परस्पर विक्री करण्यात आली होती. याविरोधात शेतकरी साईप्रसाद कल्याणकर यांनी सावंतवाडी तहसीलदारांकडे तक्रार केली होती.

माती उत्खनन, विक्री प्रकरणी ठेकेदार अडचणीत
बांदा : बांदा-सटमटवाडी येथे आरटीओ विभागाच्या सीमा तपासणी नाक्याच्या क्षेत्रात बेकायदेशीर माती उत्खनन व विक्री केल्याप्रकरणी संबंधित ठेकेदार कंपनी चांगलीच अडचणीत आली आहे. त्या क्षेत्रात विनापरवाना बेसुमार माती उत्खनन करून तिची परस्पर विक्री करण्यात आली होती. याविरोधात शेतकरी साईप्रसाद कल्याणकर यांनी सावंतवाडी तहसीलदारांकडे तक्रार केली होती.
याप्रकरणी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी ठेकेदार कंपनीला ३ अब्ज ४९ कोटी २५ लाख ७६ हजार ८०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. तशाप्रकारची नोटीस सोमवारी संबंधिताला बजावण्यात आली असून १५ दिवसांत ही रक्कम भरण्यात यावी, असे आदेश त्यांनी दिले आहेत. त्यानिमित्ताने बाधीत शेतकरी साईप्रसाद कल्याणकर यांच्या लढ्याला मोठे यश प्राप्त झाले आहे.
आरटीओ विभागाच्या सीमा तपासणी नाक्याचे काम युद्धपातळीवर सुरू असताना संबंधित ठेकेदार कंपनीने ह्यहम करे सो कायदाह्ण या उक्तीप्रमाणे बेकायदेशीर कामांचा सपाटाच लावला होता. सर्व नियम व अटी धाब्यावर बसवून नाक्याचे काम रेटण्यात आले होते. त्या कंपनीने सर्व्हे नंबर १८९ (क), क्षेत्र ११.९५.५ हेक्टर-आर जमिनीत २ लाख १२ हजार ९६२ ब्रास मातीचे विनापरवाना उत्खनन करून तिची परस्पर विक्रीही केली.
शेतकऱ्यांच्या लढ्याला मोठे यश
सावंतवाडी तहसीलदार म्हात्रे यांनी त्या ठेकेदार कंपनीला तब्बल ३ अब्ज ४९ कोटी २५ लाख ७६ हजार ८०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. या दंडाच्या रकमेत वाहतूक दंड आकारण्यात आलेला नाही. त्या दंडाची रक्कम १५ दिवसांत भरण्याचे निर्देशही तहसीलदारांनी दिले आहेत. त्यामुळे बेकायदेशीरपणे काम करणाºया कंपनीला मोठा हादरा बसला आहे. तर शेतकऱ्यांच्या कंपनी विरोधातील यशाला मोठे यश प्राप्त झाले आहे.