कंटेनरची उभ्या ट्रकला मागून धडक; सुदैवाने पोलीस कर्मचारी बचावले
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: September 9, 2022 18:41 IST2022-09-09T18:40:43+5:302022-09-09T18:41:41+5:30
सुदैवाने वेळीच याठिकाणी तैनात असलेले पोलीस कर्मचारी बाजूला गेल्याने बचावले.

कंटेनरची उभ्या ट्रकला मागून धडक; सुदैवाने पोलीस कर्मचारी बचावले
महेश सरनाईक
बांदा (सिंधुदुर्ग) : गोव्यातून अहमदनगरच्या दिशेने लोखंडाची वाहतूक करणाऱ्या कंटेनर चालकाचा ताबा सुटल्याने समोर उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात कंटेनरच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने वेळीच याठिकाणी तैनात असलेले पोलीस कर्मचारी बाजूला गेल्याने बचावले.
गोव्यातून अहमदनगरच्या दिशेने लोखंडाची वाहतूक करणारा ट्रक येत होता. बांदा पोलिसांच्या तपासणी नाक्यावर तैनात असलेल्या पोलिसांकडून इतर वाहनांची तपासणी सुरू होती. याचवेळी भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनर चालकाचा ताबा सुटल्याने या कंटेनरने उभ्या असलेल्या ट्रकला मागून धडक दिली. त्यामुळे या दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, गोव्यातून अहमदनगरकडे जाणारा हा कंटेनर चालक दारूच्या नशेत होता की काय ? याचा तपास पोलीस करत होते. कारण तपासणी नाक्यावर एवढा स्पीड ठेवल्याने कंटेनर चालकाला गाडी आवरता आली नाही.