शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणीस प्रत्यक्ष सुरुवात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 16:42 IST

मालवण: येथील राजकोट किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारण्याच्या कामास उद्यापासून सुरवात करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात चबुतऱ्यावर ...

मालवण: येथील राजकोट किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारण्याच्या कामास उद्यापासून सुरवात करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात चबुतऱ्यावर ज्या खडकावर छत्रपती उभे दाखविण्यात येणार आहेत. त्या खडकाचे भाग जोडण्याचे काम केले जाणार आहे. येत्या एप्रिल महिन्यापर्यंत हा पुतळा उभारण्याचे काम पूर्ण केले जाईल अशी माहिती शिल्पकार राम सुतार यांचे पुत्र अनिल सुतार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. राजकोट किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. आज राजकोट किल्ला येथे शिल्पकार राम सुतार यांचे पुत्र अनिल सुतार यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भेट देत पाहणी केली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, पुतळा उभारण्याच्या कामास कार्यारंभ आदेश ऑक्टोबर २०२४ मध्ये देण्यात आला. दरम्यानच्या काळात निवडणुका असल्याने ही जागा २५ डिसेंबर रोजी आमच्या ताब्यात देण्यात आली. जागा ताब्यात घेतल्यानंतर जो जुना चबुतरा होता तो तोडण्यात आला. दहा फूट खुदाई केल्यानंतर त्या ठिकाणी आढळलेल्या खडकामुळे आणखी दीड मीटरची खोदाई करावी लागली. त्यानंतर १९ फेब्रुवारी रोजी चबुतऱ्याचे काम पूर्ण करण्यात आले.या चबुतऱ्यामध्ये ड्युपलेक्स नावाचे स्टील पिलर उभारण्यात आले आहे. मोठमोठ्या पुलांच्या कामांमध्ये या प्रकारचे स्टील वापरले जाते ते स्टील येथे वापरण्यात आले आहे. समुद्राची खारी हवा तसेच अन्य बाबींचा विचार करून ड्युपलेक्स स्टील वापरण्यात आले आहे. पुतळ्याच्या उभारण्यासाठी चांगल्या दर्जाचे ब्रांझ वापरण्यात आले आहे. 

खडकाचे भाग बसवण्याच्या कामास सुरुवातशिव पुतळा उभारण्याच्या कामासाठी आवश्यक असलेले पार्ट्स येण्यास सुरुवात झाली आहे. यात ज्या खडकावर छत्रपती शिवाजी महाराज उभे दाखविण्यात येणार आहेत. त्या खडकाचे भाग बसवण्याच्या कामास उद्यापासून सुरुवात होणार आहे. यात उर्वरित पुतळ्याचे भागही येथे येण्यास सुरुवात झाली असून प्रत्येक आठवड्यात हे भाग येथे दाखल होतील. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजrajkot-pcराजकोटMalvan beachमालवण समुद्र किनारा