सावंतवाडीत केंद्र सरकारविरोधात काँग्रेसकडून आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 17:34 IST2021-04-15T17:32:48+5:302021-04-15T17:34:15+5:30
Congress Sindhudurg : कोरोनाच्या बाबतीत भाजप वगळता इतर पक्षांची सत्ता असणाऱ्या राज्यांना लस आणि इतर औषधे देण्यात केंद्र सरकार दुजाभाव करीत असल्याने जिल्हा काँग्रेसतर्फे येथील तहसीलदार कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले. काँग्रेस जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गावडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन बुधवारी सकाळी करण्यात आले. विशेष म्हणजे या आंदोलनात जिल्ह्यातील बहुतांशी पदाधिकारी सहभागी झाले होते.

सावंतवाडी येथे केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसकडून जोरदार आंदोलन करण्यात आले.
सावंतवाडी : कोरोनाच्या बाबतीत भाजप वगळता इतर पक्षांची सत्ता असणाऱ्या राज्यांना लस आणि इतर औषधे देण्यात केंद्र सरकार दुजाभाव करीत असल्याने जिल्हा काँग्रेसतर्फे येथील तहसीलदार कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले. काँग्रेस जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गावडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सकाळी करण्यात आले. विशेष म्हणजे या आंदोलनात जिल्ह्यातील बहुतांशी पदाधिकारी सहभागी झाले होते.
या आंदोलनात प्रदेश सदस्य इर्शाद शेख, जिल्हा सरचिटणीस महेंद्र सावंत, प्रदेश सदस्य विकास सावंत, कणकवली तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, प्रदेश महिला सदस्या सुगंधा साटम, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नागेश मोर्ये, महेंद्र सांगेलकर, सच्चिदानंद बुगडे, ॲड. दिलीप नार्वेकर, कौस्तुभ गावडे, तालुका महिला कॉंग्रेसच्या स्मिता वागळे, जिल्हा महिलाध्यक्ष साक्षी वंजारी, तालुका उपाध्यक्ष समीर वंजारी आदी सहभागी झाले होते.
यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. विशेष म्हणजे या आंदोलनासाठी जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्व पदाधिकारी सावंतवाडीतआले होते. जिल्ह्यात सावंतवाडी येथे एकच आंदोलन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचा जमावबंदी आदेश असतानाही जिल्हा काँग्रेसतर्फे केंद्र सरकारविरोधात तहसीलदार कार्यालयासमोर हे निषेध आंदोलन करण्यात आले.