शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
4
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
5
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
6
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
7
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
8
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
9
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
10
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
11
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
12
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
13
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
14
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
15
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
16
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
17
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
18
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
19
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
20
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
Daily Top 2Weekly Top 5

नीतेश राणेंचा प्रचाराचा पहिला टप्पा पूर्ण

By admin | Updated: September 30, 2014 00:23 IST

कणकवली मतदारसंघ : काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

कणकवली : निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतशी त्याबाबत उत्सुकता वाढत चालली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीच गेले पंधरा दिवस संभाव्य उमेदवारांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. त्यात काँग्रेसचे कणकवली विधानसभा मतदार संघातील उमेदवार नीतेश राणे यांचा प्रचाराचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून आता त्यांना या मतदारसंघात अधिकृतपणे उमेदवारी जाहीर झाल्याने मतदार संघातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पसरला आहे.विधानसभा निवडणुकीसाठी आता पंधरा दिवसांचा कालावधी उरला आहे. त्यामुळे प्रचारासाठी सर्वच राजकीय पक्षांना फार कमी कालावधी मिळणार आहे. त्यातच उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत प्रत्येक पक्षाने आपल्या अधिकृत उमेदवारांची यादीसुद्धा जाहीर केली नाही. त्यामुळे सर्वच संभाव्य उमेदवारांची तारांबळ उडाली होती. आता मात्र, प्रत्येक मतदार संघातील लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे. १ आॅक्टोबरला अर्ज मागे घेण्याची अंतीम मुदत असल्याने खऱ्या अर्थाने त्याचवेळी लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे.कणकवली मतदारसंघात काँग्रेसतर्फे नीतेश राणे हे पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात आहेत. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मरगळ होती. मात्र, नीतेश राणे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर कणकवली, देवगड आणि वैभववाडी या तिन्ही तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. नीतेश राणे यांनी प्रचाराचा पहिला आणि भेटी-गाठींचा टप्पा पूर्ण केला असून १ आॅक्टोबरनंतर दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू होणार आहे. कणकवलीसह देवगड आणि वैभववाडी तालुक्यात काँग्रेस कार्यकर्ते प्रचार जोमाने राबविणार असून या टप्प्यात छोट्या-मोठ्या प्रचार बैठका आणि विभागीय मेळावे घेण्यात येणार असल्याचे नीतेश राणे यांनी बोलताना स्पष्ट केले. विद्यमान आमदारांमुळे या मतदारसंघात ठप्प असलेली विकासकामे हा प्रचाराचा प्रमुख मुद्दा असल्याचेही नीतेश राणे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)मतदारसंघात प्रचाराचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून आपण यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. येथील समस्या जाणून घेवून त्यांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्नदेखील करण्यात येणार आहे. आपल्याला पहिल्या टप्प्यात मतदारसंघातील तिन्ही तालुक्यात लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.- नीतेश राणे, काँग्रेस प्रांतिक सदस्य