शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
2
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
3
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
4
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
5
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
6
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
7
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
8
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
9
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
10
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
11
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
12
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
13
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
14
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
15
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
16
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
17
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
18
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
19
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
20
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...

सिंधुदुर्गात यंदा पावसाची पिछाडी, गतवर्षीच्या तुलनेत अद्यापही सरासरी ४७५ मिली पाऊस कमीच

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: July 18, 2023 19:25 IST

मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाची काल, सोमवारी मध्यरात्री पासून दमदार हजेरी

गिरीश परबसिंधुदुर्गनगरी : मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने सोमवारी मध्यरात्री पासून दमदार हजेरी लावली. जिल्ह्यातील सर्वच भागात पहाटेपासूनच संततधार पाऊस पडला. काही ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. शेतकरी सुद्धा आपली शेतीची कामे झपाट्याने मार्गी लावताना दिसत होता. पुढील काही दिवस हे मुसळधार पावसाचे असणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.दरम्यान गतवर्षीच्या तुलनेत अद्यापही सरासरी ४७५ मिली पाऊस पिछाडीवर आहे.दडी मारलेल्या पावसाने मंगळवारी पहाटेपासूनच बरसायला सुरुवात केली. अगदी दिवसभर संततधार स्वरूपाचा पाऊस पडत होता. गेले काही दिवस पाऊस न पडल्याने शेतकरी राजा चिंतेत होता परंतु आज झालेल्या पावसाने शेतकऱ्यांनी बऱ्यापैकी शेतीची कामे मार्गी लावली आहेत.

जिल्ह्यात इतकी झाली पावसाची नोंदजिल्ह्यात सोमवारी सकाळी ८ वाजल्यापासून ते मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत ३५.५ मिमी च्या सरासरीने पाऊस झाल्याची नोंद आहे. सर्वाधिक दोडामार्ग तालुक्यात ५१.२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात एकूण सरासरी १३२३.६ मि.मी. पाऊस झाला आहे. देवगड- २०.०२ (१२४२.०२), मालवण- ३३.०२ (१३१७.०९), सावंतवाडी- ३९.१ (१५४९.८), वेंगुर्ला-३६.२ (१३६०.९), कणकवली- ३८ (११७५.७), कुडाळ- ४१.८ (१३४१.९), वैभववाडी- ३७ (१२३९.५), दोडामार्ग- ५१.२ (१४६५.८) असा पाऊस झाला आहे.

अद्यापही ४७५ मिमी सरासरी पाऊस पिछाडीवरगतवर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस कमी झाला आहे. आजच्या दिवसाची पावसाची नोंद घेतली असता चालू वर्षी सरासरी ४७५ मिमी पाऊस कमी झाला आहे. २०२२ मध्ये आजच्या दिवशी १७९८ मिमी सरासरी पाऊस झाला होता. सर्वाधिक पाऊस सावंतवाडी तालुक्यात २१५६ मिमी झाला होता. तर सर्वाधिक कमी पाऊस देवगड तालुक्यात १४४७ मिमी इतका झाला होता.

५१ टक्केच धरणे भरलीयंदा झालेल्या कमी पावसाने जिल्ह्यातील धरणे कासवगतीने भरत आहेत. धरणांचा आजचा अहवाल पाहता धरण केवळ ५१.४९ टक्के भरली आहेत. २०२१ मध्ये याच दिवशी ७२ टक्के तर २०२२ मध्ये ७० टक्के धरणे भरली होती. गतवर्षी चांगला पाऊस झाला होता.

आतापर्यंत झालेले नुकसान..!आज पडलेल्या पावसामुळे कोठेही नुकसान अहवाल नाही. १७ रोजीच्या नुकसान अहवालानुसार एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ४ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. ८१ अंशतः पक्की घरे कोलसली आहेत. ५ कच्ची घरे कोसळली आहेत. ३ झोपड्या, ८ गोठे कोसळले आहेत. २ जनावरे दगावली आहेत.

शेतीची कामे अंतिम टप्प्यात..!गतवर्षी जुलै च्या पहिल्या टप्प्यात शेतीची कामे पूर्ण झाली होती. या वर्षी तशी परिस्थीती नाही आहे. पाऊस उशिरा झाल्याने शेतीची कामे सुद्धा पुढे गेली आहेत. त्यात मध्ये मध्ये पाऊस दडी मारत असल्याने शेतीला आवश्यक पाणी नसल्याने लावणीची कामे थांबली होती. आज संततधार पावसामुळे शेतीची कामे मार्गी लावण्यात शेतकरी राजा व्यस्थ होता.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊसFarmerशेतकरीDamधरण