शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

सिंधुदुर्गनगरी : प्रकल्पग्रस्तांच्या हक्कांसाठी समिती लढत राहिल : दत्ताराम नागप, अरुणा प्रकल्प संघर्ष कृती समितीच्या नुतन कार्यालयाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 3:54 PM

अरुणा मध्यम प्रकल्पामुळे विस्थापित होणाऱ्या शेवटच्या माणसाला योग्य पुनर्वसन, नवीन भूसंपादन कायद्यानुसार मोबदला व अन्य सेवा सुविधांचा लाभ मिळत नाही; तोपर्यंत प्रकल्पग्रस्त समिती संघर्ष करीत राहील. त्यासाठी एकत्रित लढा देण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज राहूया, असे आवाहन आखवणे भोम अरुणा प्रकल्प संघर्ष कृती समितीचे मुंबई सचिव दत्ताराम नागप यांनी नुतन कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात केले.

ठळक मुद्देआखवणे येथे समितीच्यावतीने बांधलेल्या कार्यालयाचे उद्घाटनसंघर्ष समितीच्या नुतन कार्यालयात संगणक कक्षाचे उद्घाटनसचिव नागप यांनी घेतला गेल्या दोन वर्षाच्या समिती कामकाजाचा आढावा

वैभववाडी : अरुणा मध्यम प्रकल्पामुळे विस्थापित होणाऱ्या शेवटच्या माणसाला योग्य पुनर्वसन, नवीन भूसंपादन कायद्यानुसार मोबदला व अन्य सेवा सुविधांचा लाभ मिळत नाही; तोपर्यंत प्रकल्पग्रस्त समिती संघर्ष करीत राहील. त्यासाठी एकत्रित लढा देण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज राहूया, असे आवाहन आखवणे भोम अरुणा प्रकल्प संघर्ष कृती समितीचे मुंबई सचिव दत्ताराम नागप यांनी नुतन कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात केले.आखवणे येथे अरुणा मध्यम प्रकल्प समितीच्यावतीने बांधण्यात आलेल्या सुसज्ज कार्यालयाचे उद्घाटन आखवणे भोम अरुणा प्रकल्प संघर्ष कृती समितीचे मुंबई अध्यक्ष रामकृष्ण शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नागप बोलत होते.

व्यासपीठावर स्थानिक अध्यक्ष आकाराम नागप, सचिव डॉ. जगन्नाथ जामदार, उपाध्यक्ष रघुनाथ कदम, पुर्नवसन समिती अशासकीय सदस्य डॉ. व्यंकटेश जामदार, सरपंच अनंत सुतार, संतोष मोरे, विश्वनाथ नागप, अनिल नागप, जगन्नाथ नागप, तंटामुक्त समिती अध्यक्ष विकास जामदार, बबन बांद्रे, सुरेश नागप आदी उपस्थित होते.

संघर्ष समितीच्या नुतन कार्यालयात संगणक कक्षाचेही उद्घाटन यावेळी करण्यात आले. समितीचे सचिव दत्ताराम नागप यांनी गेल्या दोन वर्षाच्या समितीच्या कामकाजाचा आढावा घेतला. प्रकल्पग्रस्तांना सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी हे कार्यालय उपयुक्त ठरेल, अशी ग्वाही नागप यांनी दिली.

यावेळी व्यंकटेश जामदार, संतोष मोरे, अध्यक्ष रामकृष्ण शेलार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्तविक डॉ. जगन्नाथ जामदार यांनी केले. यावेळी रतन नागप, प्रकाश नागप, पांडुरंग जामदार यांच्यासह आखवणे, भोम व नागपवाडी येथील प्रकल्पग्रस्त उपस्थितीत होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गhighwayमहामार्ग