आव्हानाची पोकळ भाषा करण्यापेक्षा रणमैदानात या : राजन तेली यांचे प्रति आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2020 05:57 PM2020-11-05T17:57:34+5:302020-11-05T17:59:46+5:30

Politics, Narayan Rane, Rajan Teli, sindhudurg खासदार नारायण राणेंना आव्हान देण्याची स्वतःची योग्यता आहे का ? हे सतीश सावंत व संजय पडते यांनी स्वतःच्या अंतरात्म्याला विचारून पहावे. पण बहुधा उद्धवसेनेत जाताना स्वतःचा अंतरात्मा विकूनच तिथे प्रवेश मिळत असावा असे वाटते. आमदार नितेश राणे यांच्या राजीनाम्याने राणेंच्या हद्दपारीची एवढी तुम्हाला घाई का आहे ? अशी मागणी करण्यापेक्षा पुन्हा एकदा निवडणुकीच्या रणमैदानात या. असे प्रतिआव्हान भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिले आहे.

Come to the battlefield instead of using hollow language of challenge! | आव्हानाची पोकळ भाषा करण्यापेक्षा रणमैदानात या : राजन तेली यांचे प्रति आव्हान

आव्हानाची पोकळ भाषा करण्यापेक्षा रणमैदानात या : राजन तेली यांचे प्रति आव्हान

googlenewsNext
ठळक मुद्देआव्हानाची पोकळ भाषा करण्यापेक्षा रणमैदानात या : राजन तेली यांचे प्रति आव्हान सतीश सावंत, संजय पडते यांना प्रत्युत्तर

कणकवली : खासदार नारायण राणेंना आव्हान देण्याची स्वतःची योग्यता आहे का ? हे सतीश सावंत व संजय पडते यांनी स्वतःच्या अंतरात्म्याला विचारून पहावे. पण बहुधा उद्धवसेनेत जाताना स्वतःचा अंतरात्मा विकूनच तिथे प्रवेश मिळत असावा असे वाटते. आमदार नितेश राणे यांच्या राजीनाम्याने राणेंच्या हद्दपारीची एवढी तुम्हाला घाई का आहे ? अशी मागणी करण्यापेक्षा पुन्हा एकदा निवडणुकीच्या रणमैदानात या. असे प्रतिआव्हान भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिले आहे.

याबाबत राजन तेली यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, नीतेश राणे हे सतीश सावंत व संजय पडते यांच्या पक्षप्रमुखांच्या नाकावर टिच्चून कणकवलीतून निवडून आले आहेत. या जिल्ह्यातील त्यांच्या दोन्ही आमदारांच्या एकत्र मताधिक्यापेक्षाही अधिक मताधिक्य घेऊन त्यांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे त्यांचे आव्हान आम्ही कधीही स्वीकारून नीतेश राणेंना राजीनामा द्यायला सांगू. तसेच त्यांना पुन्हा मैदानात उतरवू . पण भाजपाच्या जीवावर बांडगुळासारखे उगवलेले तुमचे खासदार आणि दोन्ही आमदार यांनीही राजीनामा देऊन पुन्हा एकदा त्यांच्या बरोबरीने निवडणूक लढवण्याची हिंमत दाखवावी. चारही निवडणूका लढवूया. म्हणजे एकदा काय ते होऊनच जाऊ दे.यापुढे जनता कोणाची हद्दपारी करणार हे सुद्धा त्यातून दिसेलच.

फक्त बालिश बडबड करण्यापेक्षा आमचे हे आव्हान स्वीकारा आणि तुमच्या इथल्या आमदार-खासदारांच्या राजीनाम्याचा एकदा काय तो मुहूर्त ठरवा. आपल्या कामातून जनतेशी विश्वासाची नाळ जोडले गेलेले आमदार नितेश राणे मैदानात उतरायला कधीही सज्जच असतील.

सावंत व पडते यांनी आव्हानबाजी करण्यापूर्वी एकदा शिवसेना नक्की आहे कुठे ? याचा अभ्यास करावा. उगाच दंडाच्या नसलेल्या बेटक्या फुगवत बसू नये. खासदार विनायक राऊत तसेच वैभव नाईक व दीपक केसरकर हे दोन्ही आमदार केवळ भाजपाशी असलेल्या युतीमुळेच जनतेतून निवडून आले आहेत. कणकवलीमध्ये सतीश सावंत यांनी गद्दारी केली आणि तिथे शिवसेनेने त्यांना पक्षाचे अधिकृत चिन्ह देऊन गद्दारीला मान्यताही दिली. तरीही नितेश राणे निवडून आले . हे विसरू नका.असेही या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.

Web Title: Come to the battlefield instead of using hollow language of challenge!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.